Join us

चारकोपमध्ये आषाढी एकादशी दर्शन सोहळा संपन्न; हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

By मनोहर कुंभेजकर | Updated: July 17, 2024 20:31 IST

यंदा १५ ते २० हजार भाविक यांनी दर्शनाचा लाभ घेतला

मनोहर कुंभेजकर, मुंबई- कांदिवली पश्चिम चारकोप मध्ये गणेश मंदिर ट्रस्ट व सह्याद्री नगर प्रगती मंडळ ट्रस्ट आयोजित आषाढी एकादशी दर्शन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एकादशीच्या निमित्ताने सहयाद्री मध्ये गेली १६ वर्ष भव्य रथयात्रा निघते. यंदा १५ ते २० हजार भाविक यांनी दर्शनाचा लाभ घेतला.

दिंडीत वारकरी महिला आपल्या डोक्यावर तुळस घेऊन ,वारकरी पुरुष , ताळ,मृदुंग,वीणा हाती घेऊन व पालखी बरोबर माऊलीच्या जयघोषात सह्याद्री नगर मध्ये मिरवणूक मध्ये सहभागी झाले होते.वारीतील अभूतपूर्व रिंगण सोहळा येथे संपन्न झाला.संध्याकाळी ७ वाजता सुगम संगीताचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अशोकराव  फाळके,निलेश भोसले,शांताराम मांढरे,चंद्रकांत शिंदे व कार्यकर्त्यांनी  कार्यक्रम संपन्न होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

टॅग्स :आषाढी एकादशी