भाऊबीजेनिमित्त आशा भोसले यांनी आशिष शेलार यांना ओवाळले

By मनोहर कुंभेजकर | Updated: November 3, 2024 13:51 IST2024-11-03T13:51:05+5:302024-11-03T13:51:36+5:30

आशा भोसले यांनी भाऊबीजेची ओवाळणी करुन आशिष शेलार यांना आशीर्वाद दिले. 

Asha Bhosle Ashish Shelar celebrated diwali | भाऊबीजेनिमित्त आशा भोसले यांनी आशिष शेलार यांना ओवाळले

भाऊबीजेनिमित्त आशा भोसले यांनी आशिष शेलार यांना ओवाळले

मनोहर कुंभेजकर, मुंबई: महाराष्ट्र भूषण व प्रख्यात गायिका आशा भोसले गेली अनेक वर्षे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांना भाऊबीज आणि रक्षाबंधनाला राखी बांधतात. आज त्यांनी भाऊबीजेची ओवाळणी करुन आशिष शेलार यांना आशीर्वाद दिले. 

शेलार यांनी या आपल्या  दिवाळी पूर्वीच त्यांना एक अनोखी भेट दिली असून वांद्रे पश्चिम रेक्लमेश येथे आशा भोसले यांच्या नावाने "आशा सरगम सागर" असे एक सुंदर गार्डन तयार केले आहे. ज्यामध्ये आशाताईंची  छान छायाचित्रे ही लावण्यात आली आहेत. तसेच रोज या बागेत त्यांची मराठी- हिंदी गाणी ही येथे येणाऱ्यांना ऐकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.निवडणूक जाहीर होण्यापूर्वी आशाताईंच्या हस्ते या गार्डनचे लोकार्पण करण्यात आले होते.

Web Title: Asha Bhosle Ashish Shelar celebrated diwali