लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत ६४ भूखंडांवरील झोपड्यांच्या पुनर्विकासाची प्रक्रिया रखडली आहे. पूर्व उपनगरांतील २६ भूखंडांसाठी अद्याप विकासक मिळालेला नाही. या भूखंडांवरील झोपड्यांची घनता, अतिक्रमण आणि सामाजिक-आर्थिक गुंतागुंत, यामुळे विकासकांना पुनर्वसन प्रकल्प राबविणे आर्थिकदृष्ट्या तोट्याचे ठरत आहे. विकासकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेने निविदांना दोनदा मुदतवाढ दिली, मात्र विकासकांनी पाठ फिरवल्याने पालिकेने आता ११ नोव्हेंबरपर्यंत तिसऱ्यांदा मुदत वाढविली आहे. त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्यास या भूखंडांचे क्लस्टर करून पुनर्विकास राबवण्याचे नियोजन पालिकेचे आहे.
मुंबईत पालिकेच्या विविध आरक्षित भूखंडांवर ५१ हजार ५८२ झोपड्या असून, त्यांचा पुनर्विकास वर्षानुवर्षे रखडलेला आहे. राज्य सरकारने याबाबत पालिकेला स्पष्ट आदेश दिले आहेत. पालिकेने पुनर्विकासाची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या ६४ पैकी १७ योजनांमध्ये तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी असल्याने त्या स्थगित केल्या. उर्वरित ४७ योजनांसाठी निविदा मागविण्यात आल्या.
अल्प प्रतिसाद
शहर व पश्चिम उपनगरांतील योजनांना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला, तर पूर्व उपनगरातील विशेषत: देवनार आणि गोवंडी परिसरातील भूखंडांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला. पहिल्या टप्प्यात प्रतिसाद न मिळाल्याने या २६ भूखंडांसाठी पुन्हा निविदा काढली होती. मात्र, त्यावेळीही विकासकांनी स्वारस्य दाखवले नाही. त्यानंतर पुन्हा मुदतवाढ दिली, मात्र तरीही विकासकांचा काही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता पालिकेने तिसऱ्यांदा ११ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
भूखंड आणि नियोजित घरे
- विलेपार्ले पूर्व १४८
 - एकता नगर, चेंबूर ११६
 - प्लॉट १२, १४, ३४, ३६, चेंबूर १,०२१
 - दीप स्तंभ सोसायटी, गोवंडी ४,०६०
 - जय हो सोसायटी, गोवंडी २,२६१
 - संत निरंकारी सोसायटी, गोवंडी १,७६२
 - सहारा सोसायटी, गोवंडी १, ७६१
 - न्यू महाराष्ट्र सोसायटी, देवनार गाव १, ५६८
 - गुलशन-ए-अमन सोसायटी, गोवंडी १,००७
 - आदर्श सोसायटी, गोवंडी १,३०३
 - अशर्फी सोसायटी, गोवंडी १,१७६
 - तमिन सोसायटी, देवनार गाव २,८८७
 - न्यू लाइफ सोसायटी, गोवंडी ८९१
 - शास्त्रीनगर, गोवंडी ८६७
 - गरीब नगर सोसायटी, गोवंडी ८१०
 - गुरुकृपा सोसायटी, गोवंडी ६३९
 - गुलमोहर सोसायटी, गोवंडी ५७६
 - अमन एसआरए, बैंगनवाडी ३६४
 - नियमात सोसायटी, गोवंडी ३३०
 - विश्वदीप सोसायटी, गोवंडी ३२५
 - कायनात सोसायटी, गोवंडी १८४
 - गणेश नगर सोसायटी, घाटकोपर ४०
 - बर्वे नगर सोसायटी ८६
 - पंचरत्न, भटवाडी ६४३
 - विठ्ठल रुक्मिणी सोसायटी, घाटकोपर ९०३
 - सिद्धिविनायक, घाटकोपर २६३
 
Web Summary : SRA's 26 slum redevelopment schemes in Mumbai lack developers. Due to financial unviability, the deadline is extended for the third time. Cluster redevelopment may be considered.
Web Summary : मुंबई में एसआरए की 26 झोपड़पट्टी पुनर्विकास योजनाओं के लिए विकासक नहीं हैं। वित्तीय अव्यवहार्यता के कारण, समय सीमा तीसरी बार बढ़ाई गई है। क्लस्टर पुनर्विकास पर विचार किया जा सकता है।