Join us
Daily Top 2Weekly Top 5

कला शाखेसाठी मागील वर्षापेक्षा १० टक्के अर्ज वाढले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 05:49 IST

कला शाखेत मोठ्या प्रमाणात संधी असल्या, तरी त्याबाबत शाश्वती नसल्यामुळे या शाखेकडे मुलांसह पालकांचेही दुर्लक्ष झाल्याचा समज मध्यंतरीच्या काळात पसरताना दिसत होता.

मुंबई : कला शाखेत मोठ्या प्रमाणात संधी असल्या, तरी त्याबाबत शाश्वती नसल्यामुळे या शाखेकडे मुलांसह पालकांचेही दुर्लक्ष झाल्याचा समज मध्यंतरीच्या काळात पसरताना दिसत होता. मात्र, कला संचलनालयाकडून जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार हा समाज खोटा ठरला आहे. मागील वर्षापेक्षा यंदा १० टक्के अधिक विद्यार्थ्यांनी कला सीईटीसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे कला सीईटीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या साडेतीन हजारांवर गेल्याची माहिती कला संचनालयाने दिली.कला संचालक डॉ. राजीव मिश्रा यांनी याबाबत बोलताना सांगितले की, आतापर्यंत कला शाखेविषयी विद्यार्थी, पालकांच्या मनात अनेक गैरसमज होते, पण आता योग्य समुपदेशनामुळे या शाखेकडे विद्यार्थी वळू लागले आहेत. शिवाय कला शाखेतील अनेक विषयांमध्ये असलेल्या उत्तम संधीविषयी विद्यार्थी जागरूक होऊ लागले आहेत.

टॅग्स :शिक्षण क्षेत्रशैक्षणिकमुंबई