कलाकार साकारतात रुप गणेशाचे !
By Admin | Updated: August 13, 2014 01:23 IST2014-08-13T01:23:04+5:302014-08-13T01:23:04+5:30
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपल्याने विक्रमगड तालुक्यात गणेशमूर्ती बनवणाऱ्या कलाकारांची लगबग सुरु झाली आहे

कलाकार साकारतात रुप गणेशाचे !
विक्रमगड : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपल्याने विक्रमगड तालुक्यात गणेशमूर्ती बनवणाऱ्या कलाकारांची लगबग सुरु झाली आहे. वाढलेले सामानांचे दर, मजुरी, विजेचा लपंडाव, मजुरांची कमतरता अशा अनेक समस्यांशी लढत विक्रमगड तालुक्यात अनेक कुटुंबे आपला पिढीजात व्यवसाय पुढे चालवत आहेत.
आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या गणेशाचे आगमन होणार आहे. त्यासाठी भक्तांची लगबग लवकरच सुरु होईल. मात्र त्या अगोदर खरी मेहनत सुरु होते ती गणेश मूर्तिकारांची. त्यादृष्टीने कारागिरांच्या कामगिरीलाही वेग चढला आहे. काही कार्यशाळात गणेशमूर्ती तयारही झाल्या आहेत. शाडूच्या व प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींना वाढती मागणी असल्याने विक्रमगड तालुक्यातील मूर्ती बाहेरच्या तालुक्यातही नेल्या जातात. पाच दिवस सतत पडलेल्या मुसळधार पावसामुळे मूर्तीचे काम थांबल्याने अल्पावधीत त्या तयार करणे आवश्यक आहे. सध्या गणपती कारखाने अहोरात्र सुरु आहेत. त्यातच केवळ हंगामी मूर्तिकार गल्लीबोळात आल्याने अशा व्यवसायाला घरघर लागलेली दिसते. मजुरांचा तुटवडा ही सर्वात मोठी समस्या आहे.
(वार्ताहर)