Join us  

दादर-माहीममध्ये कृत्रिम तलाव; पालिकेची संमती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 5:07 PM

कोरोंनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता समुद्र चौपाटीवर गर्दी टाळावी.

मुंबई : कोरोंनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता समुद्र चौपाटीवर गर्दी टाळावी यांसाठी दादर- माहीम परिसरात कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली होती त्यास पालिकेने संमती दर्शविली आहे.

गणेशोत्सव काळात घरगुती गणेश मुरतींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. मात्र प्रत्यक्षात कृत्रिम तलावांची संख्या कमी आहे ही बाब निदर्शनास आणून देण्यासाठी मनसेचे उपाध्यक्ष व दादर-माहीम विधानसभा विभागअध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी आज परिमंडळ 2 चे पालिकेचे सहआयुक्त नरेंद्र बर्डे आणि जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांची भेट घेत त्याना निवेदन सादर केले.

दादर-माहीम परिसरात गणेश विसर्जनांसाठी कृत्रिम तलावांसाठी मनसेने जागा सुचविण्यात आल्या होत्या त्यानुसार पालिकेच्या जी उत्तर विभागाच्या वतीने दादर- माहीम परिसरात 7 ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.

शिवाजीपार्क येथील महानगर पालिका क्रीडा भवन, मृदुंगाचार्य मैदान, रमा गावंडे मैदान, जाखादेवी मंदिर भूखंड-दादर, एनटोणीया शाळेचे पटांगण, एस. के. बोले रोड येथील चौधरी वाडी मैदान, प्रभादेवी येथील चवन्नी गल्ली मैदान व धारवीत तीन याठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे. 

टॅग्स :गणेशोत्सवकोरोना वायरस बातम्यामुंबईमुंबई महानगरपालिकामनसे