पनवेलमध्ये कृत्रिम विसजर्न तलाव

By Admin | Updated: August 30, 2014 22:53 IST2014-08-30T22:53:52+5:302014-08-30T22:53:52+5:30

पेशवेकालीन ऐतिहासिक वडाळे तलाव प्रदूषणमुक्त राखण्यासाठी अशोका बाग येथे कृत्रीम विसजर्न तलाव निर्माण करण्यात आला आहे.

Artificial insemination lake at Panvel | पनवेलमध्ये कृत्रिम विसजर्न तलाव

पनवेलमध्ये कृत्रिम विसजर्न तलाव

पनवेल : पेशवेकालीन ऐतिहासिक वडाळे  तलाव प्रदूषणमुक्त राखण्यासाठी अशोका बाग येथे कृत्रीम विसजर्न तलाव निर्माण करण्यात आला आहे. याकरीता पनवेल नगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सेट्रल चॅरीटेबल ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. या ठिकाणी गणपतीच्या मूर्तीचे विसजर्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
गणरायांच्या आगमनाची लहानापासून मोठयांर्पयत चातक पक्ष्याप्रमाणो वाट पाहतात. याचे कारण म्हणजे विघ्नहर्ता, तारणहार, भक्तांच्या हाकेला धावून जाणारा देव  म्हणून गणोशाची ओळख आहे. हे सर्वाचे लाडके दैवत आहेच त्याचबरोबर त्याच्या अगमनाने घरातील वातावरण आनंदी आणि मंगलमय होते.गणोशभक्त एकत्र येऊन  दीड, पाच आणि दहा दिवस गणराया मुक्काम करतात त्यानंतर त्यांना निरोप दिला जातो. पनवेल शहरातही शेकडो सार्वजनिक आणि हजारो घरगुती गणपती आणतात.अनेक मूर्ती या प्लस्टर ऑफ पॅरीसच्या असल्याने त्याचे विघटन होत नाही. त्याचबरोबर निर्माल्य आणि इतर वस्तू मूर्तीबरोबर विसर्जीत करण्यात येत असल्याने जलाशय दूषीत होते.  गणपती वडाळे तलावात विसर्जीत केले जातात. मात्र प्लॅस्टर ऑफ  पॅरीसच्या मुर्तीमुळे  वडाळे तलावातील पाणी तर दूषीत होते त्याचबरोबर जलाशयामध्ये असलेल्या जलचरांवरही परिणाम होत असल्याचे पर्यावरणतज्ञांचे म्हणणो आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून पनवेल नगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ पनवेलने एकत्र येऊन कृत्रीम तलाव अशोका बागेत तयार केला आहे. या ठिकाणी भक्तीभावे विसजर्न करण्याचे आवाहन रोटरी क्लबकडून करण्यात आले आहे. त्यामुळे वडाळे तलाव स्वच्छ राहण्यास मदत होईलच त्याचबरोबर हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यास आपल्या सर्वाचा हातभार लागेल असा विश्वास नगराध्यक्षा चारूशीला घरत यांनी  व्यक्त केला आहे.पर्यावरण संवर्धनासाठी पालिकेने आणि रोटरीने अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला असल्याची प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमी सुभाष जाधव यांनी लोकमतला दिली.  (वार्ताहर)

 

Web Title: Artificial insemination lake at Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.