अर्शीद कुरेशी, रिझवान खानचा ताबा मुंबई पोलिसांकडे

By Admin | Updated: August 30, 2016 05:25 IST2016-08-30T05:25:10+5:302016-08-30T05:25:10+5:30

धर्मपरिवर्तन आणि इसिससाठी नागरिकांचे ब्रेन वॉश केल्याप्रकरणी केरळ एटीएसच्या ताब्यात असलेल्या अर्शिद कुरेशी आणि रिझवान खानचा ताबा सोमवारी मुंबई पोलिसांनी घेतला.

Arshad Qureshi, Rizwan Khan's custody to Mumbai Police | अर्शीद कुरेशी, रिझवान खानचा ताबा मुंबई पोलिसांकडे

अर्शीद कुरेशी, रिझवान खानचा ताबा मुंबई पोलिसांकडे

मुंबई : धर्मपरिवर्तन आणि इसिससाठी नागरिकांचे ब्रेन वॉश केल्याप्रकरणी केरळ एटीएसच्या ताब्यात असलेल्या अर्शिद कुरेशी आणि रिझवान खानचा ताबा सोमवारी मुंबई पोलिसांनी घेतला. न्यायालयाने त्याला १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नागपाडा पोलीस ठाण्यात कुरेशी, खानसह मौलवी मोहम्मद हनीफ विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. केरळमधील अब्दुल
यांनी त्यांचा मुलगा अश्फाक या तिघांमुळे इसिसमध्ये सहभागी झाल्याचा आरोप
केला आहे. त्यानुसार या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल होताच पोलिसांनी हनीफला अटक केली. त्यांच्या चौकशीत अश्फाक हा पत्नी, मुलगा आणि अन्य दोन नातेवाईकांसह यात सहभागी असल्याचे समजले. मात्र याचा
अधिक तपास करण्यासाठी कुरेशी आणि खानचा ताबा मिळणे पोलिसांना महत्त्वाचे
होते. मुंबई पोलिसांच्या पाठपुराव्यामुळे अखेर कुरेशी आणि खानचा ताबा पोलिसांना मिळाला आहे.
रविवारी रात्री उशिरा दोघांना मुंबईत आणत अश्फाक प्रकरणात अटक करण्यात आली. सोमवारी किल्ला कोर्टाने दोघांनाही १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुळचा केरळ येथील रहिवासी असलेल्या हनीफला अश्फाक भेटत होता. हनीफनेच कुरेशी आणि रिझवानसोबत अश्फाकची भेट घडवली होती. केरळसहीत मुंबईतील डोंगरी येथे असलेल्या डॉ. झाकिर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊण्डेशनच्या कार्यालयात त्यांनी भेट घेतली होती. त्यानुसार दोघांकडेही अधिक तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.

Web Title: Arshad Qureshi, Rizwan Khan's custody to Mumbai Police