बलात्कारप्रकरणी तरु णाला अटक

By Admin | Updated: July 9, 2014 01:37 IST2014-07-09T01:37:08+5:302014-07-09T01:37:08+5:30

ठाणो जिल्ह्यातील मुरबाड येथील एका तरुणाने कर्जतमधील तरुणीशी प्रेमाचे नाटक करून शरीरसंबंध ठेवले. या प्रेमसंबंधातून मुलीने बाळाला जन्म दिला.

The arrest of the young man in the rape case | बलात्कारप्रकरणी तरु णाला अटक

बलात्कारप्रकरणी तरु णाला अटक

कर्जत : ठाणो जिल्ह्यातील मुरबाड येथील एका तरुणाने कर्जतमधील तरुणीशी प्रेमाचे नाटक करून शरीरसंबंध ठेवले. या प्रेमसंबंधातून मुलीने बाळाला जन्म दिला. मात्र आता त्या तरुणाने दोघांना नाकारल्याने पीडितेने कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुरबाड येथील भादाने गावातील दहेश गणपत यशवंतराव याचे कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथील तरुणीशी ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दहेश तिला घेऊन फिरायला जाऊ लागला. त्या ठिकाणी त्याचे शारीरिक संबंध आले. त्यातून ती गरोदर राहिली. तिने बाळाला जन्म दिला. मात्र त्यानंतर दहेश तिला टाळू लागला. अखेर तरुणीने कर्जत पोलीस ठाण्यात दहेश यशवंतरावविरुद्ध तक्रार दाखल केली. कर्जत पोलिसांनी दहेशविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)

 

Web Title: The arrest of the young man in the rape case