सेक्स रॅकेटप्रकरणी शिवसेना महिला पदाधिका-याला अटक
By Admin | Updated: July 9, 2016 10:48 IST2016-07-09T10:37:52+5:302016-07-09T10:48:53+5:30
सेक्स रॅकेटप्रकरणी शिवसेनेच्या उल्हासनगरमधील महिला पदाधिकारी शोभा गमलाडू यांना पोलिसांनी अटक केली आहे.

सेक्स रॅकेटप्रकरणी शिवसेना महिला पदाधिका-याला अटक
>ऑनलाइन लोकमत
उल्हासनगर, दि. ९ - सेक्स रॅकेटप्रकरणी शिवसेनेच्या उल्हासनगरमधील महिला पदाधिकारी शोभा गमलाडू यांना पोलिसांनी अटक केली आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 1 मधील शिवसेना महिला संघटक असलेल्या गमलाडू यांच्यावर तरूणींची तस्करी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
शुक्रवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास एचटीसी गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिका-यांनी बिर्ला कॉलेजसमोरील ड्युक्स प्लाझा येथून २ मुलींची सुटका केली. त्यानंतर त्यांनी सेक्स रॅकेटप्रकरणी गमलाडू यांना अटक केली
दरम्यान शिवसेनेकडून याप्रकरणी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.