नायजेरियन तरुणाच्या ह्त्येप्रकरणी पोलीसांचे अटकसत्र
By Admin | Updated: September 21, 2016 16:40 IST2016-09-21T16:40:56+5:302016-09-21T16:40:56+5:30
अंमली पदार्थाच्या तस्करीवरुन झालेल्या वादात नायजेरियन तरुणाची ह्त्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे

नायजेरियन तरुणाच्या ह्त्येप्रकरणी पोलीसांचे अटकसत्र
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ : अंमली पदार्थाच्या तस्करीवरुन झालेल्या वादात नायजेरियन तरुणाची ह्त्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींकडे पोलिसांकडून कसुन चौकशी सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार, १७ सप्टेंबर रोजी डोंगरी पोलीस ठाणे परिसरात सँमसन चीविस्टीयन चिडकवे (27), यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला होता, त्याच्या मिञाने त्याला वाशी येथील शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. वाशी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत हा गुन्हा पुढील तपासासाठी डोंगरी पोलिसांकडे वर्ग केला. त्यावेळी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या गुन्ह्यातील आरोपींनी सँमसनला धारदार शस्त्रानी वार करुन सैंड्हर्स्ट रोड रेल्वे स्टेशन यार्ड येथून पळ काढला.
आलम अली शेख, युसुफ अली शेख, अफझल अली शेख यांना अटक केली आहे. मुंबईतील अमली पदार्थ तस्करी करण्यावरून भारतीय आणि नायजेरियन टोळीतील हा वाद फार पूर्वीपासून सुरू होता. त्यावरूनच ही हत्या केल्याचे तपासात समोर येत आहे.