कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्याला अटक
By Admin | Updated: October 25, 2015 02:24 IST2015-10-25T02:24:43+5:302015-10-25T02:24:43+5:30
पार्किंगच्या वादातून एका ३४ वर्षांच्या विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी कामगार सेनेचा पदाधिकारी सतीश माने याला भांडुप पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात छेडछाड

कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्याला अटक
मुंबई : पार्किंगच्या वादातून एका ३४ वर्षांच्या विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी कामगार सेनेचा पदाधिकारी सतीश माने याला भांडुप पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात छेडछाड, शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही महिला भांडुप परिसरात राहण्यास असून, नृत्यशिक्षिका आहे. बुधवारी रात्री भांडुप ड्रीम्स मॉलच्या पार्किंगमधून गाडी काढत असताना, मानेने त्याची इनोवा कार महिलेच्या कारसमोर उभी केली होती. गाडी बाजूला घेण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. मानेने महिलेकडे पाहून अश्लील शिवीगाळ करीत अन्य तिघा मित्रांसमवेत तिची टिंगलटवाळी केली. तेथे सुरक्षारक्षक नसल्याने महिलेने सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे पाहत आरडाओरड सुरू केली. त्यानंतर काही कर्मचारी तेथे आले, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)