तरुणाची हत्या करणाऱ्यांना अटक

By Admin | Updated: June 17, 2014 01:53 IST2014-06-17T01:53:16+5:302014-06-17T01:53:16+5:30

सोनवडे गावच्या हद्दीत मारुती तांबड्या कोळी (२८) याची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. ही हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात तळा पोलिसांना यश आले आहे

The arrest of the killers of the youth | तरुणाची हत्या करणाऱ्यांना अटक

तरुणाची हत्या करणाऱ्यांना अटक

तळा : सोनवडे गावच्या हद्दीत मारुती तांबड्या कोळी (२८) याची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. ही हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात तळा पोलिसांना यश आले आहे.
आरोपींनी कोणताही पुरावा मागे ठेवला नसताना मोठ्या शर्थीने पोलिसांनी सापळा रचून आरोपी विश्वनाथ गजानन मानकर (३४) रा. महागांव व स्वप्नील सुरेश शिंदे (२८) रा. वावेदिवाळी यांना अटक केली.
४ जून रोजी मारुती कोळी हा महागांव आदिवासीवाडी येथून इंदापुरला जात आहे, असे सांगून घराबाहेर पडला होता. परंतु त्याचा दोन दिवस पत्ता लागला नाही. ६ जून रोजी सोनखडे गावच्या हद्दीत त्याचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी पोलीस ठाणे तळा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबाबत डीवायएसपी अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक प्रकाश मुंढे आणि त्यांच्या पथकाने तपास करून १५ जून रोजी दोन आरोपींना जेरबंद केले. आरोपी विश्वनाथ मानकर व स्वप्नील शिंदे हे एका फार्महाऊसवरती काम करतात. त्या फार्महाऊसवर थ्रीफेस लाईन घेतल्याने महागांव आदिवासी वाडीवरील लाईटही डीम होत होती. याबाबत मारुती कोळी (ग्रामपंचायत सदस्य) यांनी विचारणा केली असता राग आल्याने आरोपींनी मारुती कोळी यांच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे उघड झाले. (वार्ताहर)

Web Title: The arrest of the killers of the youth