लैंगिक अत्याचार करणाऱ्या वयस्कर फादरला अटक
By Admin | Updated: December 4, 2015 01:52 IST2015-12-04T01:52:08+5:302015-12-04T01:52:08+5:30
प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेलेल्या १३ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या चर्चच्या फादरला, शिवाजी नगर पोलिसांनी बुधवारी अटक केली. जॉनसन लॉरेन्स क्रिसिस (५२) असे त्याचे

लैंगिक अत्याचार करणाऱ्या वयस्कर फादरला अटक
- ५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
मुंबई : प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेलेल्या १३ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या चर्चच्या फादरला, शिवाजी नगर पोलिसांनी बुधवारी अटक केली. जॉनसन लॉरेन्स क्रिसिस (५२) असे त्याचे नाव असून, न्यायालयाने त्याला ५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शिवाजी नगर येथील द किंग चर्चमध्ये १३ वर्षीय मुलगा कुटुंबीयांसोबत २७ नोव्हेंबर रोजी प्रार्थनेसाठी गेला होता. प्रार्थनेनंतर इतर मित्रमंडळींच्या समवेत त्याचे कुटुंबीयही पुढे निघून गेले. याच संधीचा फायदा घेत, क्रिसिसने अल्पवयीन मुलाला चर्चच्या खोलीत डांबून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी ३० नोव्हेंबर रोजी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलीसांनी फादरचा शोध सुरू केला होता. अखेर बुधवारी सायंकाळच्या सुमारास क्रिसिसला अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)