मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या बंगल्यावर पाण्याच्या २४ लाख ५६ हजार ४६९ रुपयांची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:24 IST2020-12-15T04:24:21+5:302020-12-15T04:24:21+5:30

मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या बंगल्यावर पाण्याची सुमारे २४ लाखांची थकबाकी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सामान्य मुंबईकरांनी जर दोन ते तीन ...

Arrears of Rs. 24 lakh 56 thousand 469 for water on the bungalow of the Chief Minister and other ministers | मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या बंगल्यावर पाण्याच्या २४ लाख ५६ हजार ४६९ रुपयांची थकबाकी

मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या बंगल्यावर पाण्याच्या २४ लाख ५६ हजार ४६९ रुपयांची थकबाकी

मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या बंगल्यावर पाण्याची सुमारे २४ लाखांची थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सामान्य मुंबईकरांनी जर दोन ते तीन महिन्यांपर्यंत पाण्याचे बिल भरले नाही तर बृहन्मुंबई महानगरपालिका जलजोडणी खंडित करते, परंतु महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर मेहेरबान आहे. कारण मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याच्या एकूण २४ लाख ५६ हजार ४६९ रुपयांची थकबाकी आहे. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला पालिकेने डिफॉल्टर यादीत टाकले आहे.

शासकीय विभाग पाण्याची थकबाकी वेळेवर भरत नसेल तर सामान्य जनतेने का भरावी? तसेच महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल मंत्र्यांच्या शासकीय आवासाचे पाणी खंडित करण्याची हिंमत करणार का, असा सवाल आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी उपस्थित केला आहे.

* यांच्या नावांचा समावेश

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती गोळा केली. यात मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याची थकबाकी असल्याचे समाेर आले. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (वर्षा बंगला), मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मी (तोरणा), वित्तमंत्री अजित पवार (देवगिरी), जयंत पाटील (सेवासदन), नितीन राऊत, ऊर्जामंत्री (पर्णकुटी), बाळ थोरात, महसूलमंत्री (रॉयलस्टोन), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (सागर), अशोक चव्हाण (मेघदूत), उद्याेगमंत्री सुभाष देसाई (पुरातन), दिलीप वळसे पाटील (शिवगिरी), सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे (नंदनवन), आराेग्यमंत्री राजेश टोपे (जेतवन), विधानसभा अध्यक्ष नाना पटाेले (चित्रकुट), राजेंद्र शिंगे (सातपुडा), नवाब मलिक (मुक्तागिरी), छगनराव भुजबळ (रामटेक), रामराजा निंबाळकर विधानभवन सभापती (अजंथा) आणि सह्याद्री अतिथीगृहाचे नाव आहे.

.........................

Web Title: Arrears of Rs. 24 lakh 56 thousand 469 for water on the bungalow of the Chief Minister and other ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.