Join us  

World Environment Day: स्टेटस सिंबॉलच्या नावाखाली मुंबईच्या विनाशाची व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 5:52 AM

पर्यावरणप्रेमींचा आरोप : माणसाने सृष्टीने केलेली रचना बदलण्याचा प्रयत्न केल्यास ‘निसर्ग’ कोपणारच

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : येथील जवळजवळ २५,००० झाडे व मुंबईसाठी महत्त्वाचे काम करणारे माहीमच्या खाडीतील व आरेचे अशा दोन जंगलांचे भाग नष्ट करून शहराला स्टेटस सिंबॉल देण्याच्या नावाने पूर्ण विनाशाची व्यवस्था केली जात आहे, असे म्हणणे मुंबई रक्षण समिती, भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळीने मांडले.

५ जून जागतिक पर्यावरण दिन आणि महाराष्ट्राच्या किनारी बुधवारी धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या अनुषंगाने मुंबईतल्या पर्यावरणाच्या हानीकडे संबंधितांनी लक्ष वेधले. मुंबई रक्षण समिती, भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळीचे निमंत्रक अ‍ॅड. गिरीश राऊत यांनी सांगितले की, वादळामुळे होणारी हानी मानवी हस्तक्षेपामुळे अनेक पटीने वाढते. सागरात खाड्या, खाजणे, नदीमुखांतील भरावामुळे साध्या बदलांचे मोठ्या उलथापालथीत रूपांतर होते. निसर्गाने कोट्यवधी वर्षे केलेली रचना आपण बदलतो. तेव्हा शेकडो, हजारो वर्षांतील घटनांचा विचार केलेला नसतो. जीवसृष्टीच्या उत्क्रांतीचा या घडणीशी असलेला संबंध लक्षात घेतला तर कोणताही हस्तक्षेप करायचाच नसतो. आपण मुंबईत याचा अनुभव २६ जुलै २००५ रोजीच्या जलप्रलयात व त्यानंतर महाराष्ट्रात सतत इतर ठिकाणी घेतला.वारंवार येणारी वादळे, टोळधाडी, अवकाळी, अतिवृष्टी, बर्फवृष्टी, उष्णतेच्या लाटा आणि कोरोनासारखे विषाणू व वाढता कॅन्सर याला कारण निसर्गातील मानवी हस्तक्षेप आहे. प्रगती, विकास व आधुनिकतेच्या चुकीच्या कल्पनेतून हा हस्तक्षेप मानव करत आहे. भारतीय उपखंडात, मुंबईत सन १७८४ ला वरळी व गिरगाव बेट जोडण्यापासून सुरू झालेल्या विध्वंसाने आता कळस गाठला आहे. लॉकडाउनला न जुमानता होणारे, मेट्रो ३ भुयारी रेल्वे व सागरी रस्ता प्रकल्प, धोकादायक आहेत. वस्तू व ऊर्जानिर्मिती आणि त्यांच्या वापरावर आधारित औद्योगिक जीवनशैली, यासाठी प्रचंड प्रकल्प केले जातात. यातून सृष्टीशी खेळले जाते.

आम्ही नागरिक, मच्छीमार व इतरांनी मिळून वीस वर्षांपूर्वी, पुढील धोका ओळखून वांद्रे-वरळी सी-लिंकचा माहीम उपसागर बुजवणारा भराव, आंदोलन करून थांबवला. मिठी नदीवर झालेल्या भरावापैकी काही भाग काढायला लावला. त्यामुळे २६ जुलै २००५ रोजी लाखो माणसे बुडून मरण्यापासून व मुंबई नामशेष होण्यापासून वाचल्याचे राऊत यांनी सांगितले.विधिनिषेधशून्य वर्तन सुरूच१९८० पासून नव्या विषाणूंचे आक्रमण सुरूच आहे. या काळात वातावरणातील कार्बनडाय आॅक्साइड वायू वाढत गेला. प्राणवायूचे प्रमाण कमी होत गेले. या परिस्थितीत श्वसनमार्ग व फुप्फुसे ही इंद्रिये खाणारा कोरोना विषाणू आला.च्तो प्रदूषणकारी औद्योगिक शहरांत झपाट्याने पसरला आणि आतापर्यंत त्याने लाखो बळी घेतले. तरीही विधिनिषेधशून्य वर्तन सुरूच आहे, अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली.

टॅग्स :World Environment Dayनिसर्ग चक्रीवादळमुंबईपर्यावरण