तुर्भेत रुळांलगत पोलिसांचा बंदोबस्त
By Admin | Updated: November 30, 2014 23:07 IST2014-11-30T23:07:20+5:302014-11-30T23:07:20+5:30
तुर्भे नाका येथे पादचारी पुलाअभावी नागरिकांना जीव धोक्यात घाऊन रेल्वेरूळ ओलांडावा लागत आहे. यातून होणारे अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

तुर्भेत रुळांलगत पोलिसांचा बंदोबस्त
नवी मुंबई : तुर्भे नाका येथे पादचारी पुलाअभावी नागरिकांना जीव धोक्यात घाऊन रेल्वेरूळ ओलांडावा लागत आहे. यातून होणारे अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
तुर्भे नाका येथील जनता मार्केटमध्ये जाण्यासाठी नागरीकांना रेल्वेरूळ ओलांडावा लागतो. ठाणे वाशी रेल्वेमार्गामुळे हा परिसर दोन भागात विभागला गेला आहे. मात्र त्या ठिकाणी रेल्वे पादचारी पुल नसल्याने नागरीकांना रेल्वेरुळ ओलांडणे हाच पर्याय आहे. अशातच तेथे जनता मार्केटचा विस्तार हा रेल्वे रुळापर्यंत पसरलेला आहे. त्यामुळे रुळ ओलांडणा-या पादचा-यांना रेल्वे दिसत नसल्याने त्यांचे अपघात होत आहेत.
सततच्या अपघातांमुळे या ठिकाणी अनेकवेळा नागरिकांनी आंदोलने केली. मात्र तरीही प्रशासनाकडून पादचारी पूल उभारणीकडे दुर्लक्षामुळे तेथे घडणारे अपघात टाळण्याची भूमिका पोलीसांच्या खांद्यावर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तुर्भे नाका येथील रेल्वे रुळालगत रेल्वे पोलीसांचा बंदोबस्त लावला जात आहे. रुळांच्या दुतर्फा एकूण चार पोलीस नेमण्यात आले आहेत. सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत हा बंदोबस्त लावला जात आहे. (प्रतिनिधी)