अर्नाळ्यात पावसामुळे वृक्ष उन्मळले
By Admin | Updated: July 27, 2014 23:13 IST2014-07-27T23:13:43+5:302014-07-27T23:13:43+5:30
सोसाट्याचा वारा, सोबतच मुसळधार पाऊस यामुळे वसई परिसराला मोठा तडाखा बसला असताना अर्नाळ्यातील बंदरपाडा येथील झाडे उन्मळून पडल्याने येथील वीज यंत्रणा कोलमडली.

अर्नाळ्यात पावसामुळे वृक्ष उन्मळले
नायगाव : सोसाट्याचा वारा, सोबतच मुसळधार पाऊस यामुळे वसई परिसराला मोठा तडाखा बसला असताना अर्नाळ्यातील बंदरपाडा येथील झाडे उन्मळून पडल्याने येथील वीज यंत्रणा कोलमडली.
यापूर्वीच येथील रहिवाशांनी जर्जर झालेल्या महावितरणच्या यंत्रणेबाबत तक्रारी केल्या होत्या, परंतू त्याची वेळेत दुरुस्ती न झाल्याने मुसळधार पावसाचा फटका बसला. विशेष म्हणजे महावितरणकडे मनुष्यबळ नसल्याने स्थानिकांनीच कर्मचाऱ्यांसोबत मेहनत करून येथील वीजसेवा तात्पुरती सुरू केली. सदर भाग ग्रामपंचायतीत मोडत असल्याने अतिजलद यंत्रणा नाही.
भर पावसातच रहिवाशांनी ही समस्या दूर करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांसोबत वेळ, श्रम खर्ची घातला. वीज तारा तुटल्याने हा संपूर्ण परिसर उशिरापर्यंत अंधारात होता. (वार्ताहर)