अर्णब गोस्वामींचे आरोपींमध्ये नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:05 IST2021-06-23T04:05:52+5:302021-06-23T04:05:52+5:30

टीआरपी घोटाळा; मुंबई पोलिसांकडून पुरवणी आरोपपत्र दाखल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कथित टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मंगळवारी ...

Arnab Goswami's name among the accused | अर्णब गोस्वामींचे आरोपींमध्ये नाव

अर्णब गोस्वामींचे आरोपींमध्ये नाव

टीआरपी घोटाळा; मुंबई पोलिसांकडून पुरवणी आरोपपत्र दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कथित टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मंगळवारी एस्प्लानेड दंडाधिकारी न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. त्यात पोलिसांनी रिपब्लिकन टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आरोपी केले आहे.

गोस्वामी यांच्यासह एआरजी आउटलायर, मुख्य आर्थिक अधिकारी शिवा सुब्रमण्यम, प्रिया मुखर्जी आणि अन्य अधिकारी शिवेंद्र मुंढेरकर, अमित दवे, संजय वर्मा आणि संजय वालटकर यांचाही समावेश आहे. दुसरे आरोपपत्र सुमारे १६०० पानांचे आहे आणि त्यात आणखी ७ आरोपींचा समावेश आहे.

कथित टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नऊ महिन्यांपूर्वी गुन्हा नोंदवला. त्यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्यात रिपब्लिकन टीव्हीचा समावेश असल्याचे सांगितले.

रिपब्लिकन टीव्हीबरोबर बॉक्स सिनेमा, फक्त मराठी या वाहिन्यांचाही या घोटाळ्यात समावेश असून, त्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी बार्कचे (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल) माजी अध्यक्ष पार्थो दासगुप्ता यांना लाच देण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

हंसा रिसर्च ग्रुपद्वारे बार्कने याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यावर हा घोटाळा उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी १३ जणांना अटक केली. सर्व आरोपींवर फसवणूक, फौजदारी स्वरूपाचा कट रचणे आणि पुरावे नष्ट करणे इत्यादीअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

--------------------------

Web Title: Arnab Goswami's name among the accused