Join us

अर्णब गोस्वामी हाजीर हो... विधिमंडळ समितीचे समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 04:35 IST

अर्णब गोस्वामी हजर न राहिल्याने त्यांना हे समन्स बजावण्यात आले असून, बुधवारी अर्णब यांना विधिमंडळात हजर राहावे लागणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना विधिमंडळाच्या हक्कभंग समितीसमोर हजर राहण्यासाठी पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे. यापूर्वी नोटीस बजावूनही अर्णब गोस्वामी हजर न राहिल्याने त्यांना हे समन्स बजावण्यात आले असून, उद्या बुधवारी अर्णब यांना विधिमंडळात हजर राहावे लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी गोस्वामी यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यात आला होता. सप्टेंबरमध्ये शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक व पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभेत अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला होता. यानंतर अर्णब गोस्वामी विधिमंडळात हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र ते गैरहजर राहिले होते. त्यामुळे आता त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात आला आहे.

टॅग्स :अर्णब गोस्वामी