सेनेच्या दुख:या नसेवर बोट

By Admin | Updated: August 31, 2014 00:43 IST2014-08-31T00:43:16+5:302014-08-31T00:43:16+5:30

मागील विधानसभा व त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत दादरमधील शिवसेनेचा पराभव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जिव्हारी लागला होता.

Army misery: The snake finger | सेनेच्या दुख:या नसेवर बोट

सेनेच्या दुख:या नसेवर बोट

संदीप प्रधान ञ मुंबई
मागील विधानसभा व त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत दादरमधील शिवसेनेचा पराभव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जिव्हारी लागला होता. आता त्याच दादरमध्ये हातपाय पसरण्याची तयारी मुंबई भाजपाने सुरू केली आहे. तीन वर्षानी होणा:या महापालिका व पाच वर्षानी होणा:या विधानसभा निवडणुकीत दादरवर भाजपाचा कब्जा करण्याची रणनीती आखली जात असल्याचे समजते.
मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या आदेश बांदेकर यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नितीन सरदेसाई यांनी पराभव केला. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीतही दादरमध्ये शिवसेनेचा दारुण पराभव झाला. शिवाजी पार्कवरील मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दादरमधील हा पराभव आपल्या जिव्हारी लागल्याची खंत व्यक्त केली होती. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राहुल शेवाळे विजयी झाले. त्यांना चांगले मताधिक्य प्राप्त झाले. मात्र भाजपाने आता दादरमध्ये हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे सहसंघटनमंत्री व्ही. सतीश यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र हायस्कूलमध्ये अलीकडेच भाजपा कार्यकत्र्याची बैठक झाली. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आपला काही आमदार निधी दादरमधील मध्यमवर्गीयांच्या सोसायटय़ांमध्ये खर्च केला आहे.
याबाबत आशिष शेलार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आपण आपला 9क् टक्के आमदार निधी वांद्रे येथे तर 1क् टक्के दादरमध्ये खर्च केला ही वस्तुस्थिती आहे. भाजपाच्या कार्यकत्र्याच्या मागणीवरून निधी दिला आहे. व्ही. सतीश यांच्या बैठका मुंबईत ठिकठिकाणी झाल्या. यामध्ये मित्रपक्षाला त्रस देण्याचा प्रश्नच नाही. 
 
आतार्पयत दादरकडे दुर्लक्ष करणा:या भाजपाने या परिसराकडे लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. येत्या विधानसभा निवडणूक निकालानंतर मुंबई महापालिकेची निवडणूक 2क्17मध्ये होईल. त्या वेळी या भागात शिवसेनेची स्थिती कमकुवत राहिली तर 2क्19च्या निवडणुकीत दादर या शिवसेनेच्या गंडस्थळावर भाजपाकडून हल्ला होण्याची रणनीती निश्चित करण्यात आल्याचे समजते. 

 

Web Title: Army misery: The snake finger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.