भाजपाकडून सेनेचा गेम
By Admin | Updated: March 5, 2015 01:55 IST2015-03-05T01:55:35+5:302015-03-05T01:55:35+5:30
काँग्रेस सरकारच्या दरबारात रखडला़ विशेष म्हणजे राज्यात भाजपा सरकार आल्यानंतरही या प्रस्तावाला जानेवारी महिन्यात केराची टोपली दाखवीत मित्रपक्षाने पुन्हा एकदा शिवसेनेला दणका दिला आहे़
भाजपाकडून सेनेचा गेम
मुंबई : कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने २००९ मध्ये पुनर्प्रक्रिया प्रकल्प आणला़ मात्र गेली पाच वर्षे हा प्रस्ताव काँग्रेस सरकारच्या दरबारात रखडला़ विशेष म्हणजे राज्यात भाजपा सरकार आल्यानंतरही या प्रस्तावाला जानेवारी महिन्यात केराची टोपली दाखवीत मित्रपक्षाने पुन्हा एकदा शिवसेनेला दणका दिला आहे़
देवनार येथील डंपिंग ग्राउंडवर संपूर्ण शहराचा भार आहे़ मात्र येथील कचऱ्याचे डोंगर वाढत असल्याने डंपिंगची मर्यादा संपुष्टात आली आहे़ त्यामुळे साडेतीन हजार कोटींचा कचरा पुनर्प्रक्रिया प्रकल्प सेना-भाजपा युतीने २००९ मध्ये आणला़ मात्र यामध्ये घोटाळा असल्याचा आरोप करीत डंपिंग ग्राउंडचा भूखंड खाजगी कंपनीला एक रुपया दराने भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव काँग्रेस सरकारने लांबणीवर टाकला़
युतीचे राज्य येताच हा प्रस्ताव मंजूर होईल, याची सेनेला खात्री होती़ त्या वेळीस सेनेचे या प्रकल्पाचा आग्रह धरला होता़ मात्र सत्तेवर आल्यानंतर मित्रपक्षाचा सूर बदलला आहे़ भाजपाने नकार कळविला
असल्याचे काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी उघडकीस आणले़
(प्रतिनिधी)