के (पश्चिम) विभागात सेना-भाजपाची कडवट झुंज
By Admin | Updated: February 16, 2017 02:29 IST2017-02-16T02:29:35+5:302017-02-16T02:29:35+5:30
विलेपार्ले (प.) ते जोगेश्वरी(प.) या पालिकेच्या के (पश्चिम) विभागात यंदाच्या पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाच्या अस्तित्वाची खरी लढाई

के (पश्चिम) विभागात सेना-भाजपाची कडवट झुंज
मनोहर कुंभेजकर / मुंबई
विलेपार्ले (प.) ते जोगेश्वरी(प.) या पालिकेच्या के (पश्चिम) विभागात यंदाच्या पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाच्या अस्तित्वाची खरी लढाई आहे. त्यांच्या मतविभाजनाचा काँग्रेस, मनसेला कसा फायदा होणार यावर या चार प्रमुख राजकीय पक्षांचे भवितव्य अवलंबून आहे. वर्सोवा आणि अंधेरी (प.) हे प्रामुख्याने दोन विधानसभा मतदारसंघ या विभागात येतात.
वर्सोवा विधानसभा मतदारसंघात प्रभाग क्र. ५९, ६०, ६१, ६२, ६३ आणि ६८ चा काही भाग येतो. तर अंधेरी (प.) मतदारसंघात प्रभाग क्र. ६४, ६५, ६६, ६७, ६९, ७०, ७१ अशा एकूण १३ नगरसेवकांचा समावेश असलेल्या या विभागात यंदा नव्या आरक्षणामुळे १३ पैकी ९ महिला आहेत. या नवदुर्गांर्पैकी कोण निवडून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
च्प्रभाग ६४ सर्वसाधारण महिलांसाठी असलेल्या या मतदारसंघात एकूण ५६ हजार ५९५ लोकसंख्या आहे. येथे एकूण ९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेनेने येथे अल्पसंख्याक उमेदवार दिला आहे. शाखाप्रमुख हारून खान यांच्या पत्नी शाहिदा खान, भाजपाच्या आकृती प्रसाद, काँग्रेसच्या गीतांजली कारेकर, मनसेच्या स्नेहा तावडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शारदा कांबळे या पाच प्रमुख उमेदवारांमध्ये लढत आहे.
च्प्रभाग ६५ ओबीसी (महिला) साठी राखीव असलेल्या या मतदारसंघात एकूण ५४ हजार ९८१ लोकसंख्या आहे. येथे एकूण ८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून शिवसेनेतून शाखाप्रमुख प्रसाद आयरे यांच्या पत्नी नूतन आयरे, भाजपाच्या माया राजपूत, काँग्रेसमधून अल्पा जाधव, मनसेच्या विलास राऊत लढत आहे.
च्प्रामुख्याने अल्पसंख्याक मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग ६६ मध्ये एकूण ५९ हजार ८५४ लोकसंख्या आहे. या प्रभागात एकूण ९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून काँग्रेसच्या मेहर हैदर, एमआयएमच्या फिरदोस शेख यांच्यात प्रमुख लढत आहे. शिवसेनेच्या योगिता कुशाळकर, भाजपाच्या शीला शाह, मनसेच्या संजना पवार हे उमेदवार आहेत.
च्प्रभाग ६७ मध्ये चार उमेदवार रिंगणात आहे. यामध्ये सेनेच्या प्राची परब, भाजपाच्या सुधा सिंग, काँग्रेसच्या नगरसेविका वनिता मारुचा आणि मनसेच्या राधिका सिंग यांच्यात लढत आहे.
च्प्रभाग ६८ या सर्वसाधारण पुरुषांसाठी असलेल्या प्रभागात एकूण ५६ हजार ३१३ लोकसंख्या आहे. येथे १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेनेचे देवेंद्र (बाळा) आंबेरकर, भाजपाचे रोहन राठोड यांच्यात प्रमुख लढत असून काँग्रेसचे इंदरपाल सिंग, मनसेचे सचिन तळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुसूदन सदडेकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
च्प्रभाग ६९ या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात ५१ हजार ६२२ लोकसंख्या आहे. या प्रभागात एकूण ९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपाच्या रुणू हंसराज, काँग्रेसच्या भावना जैन, शिवसेनेच्या अंजली पालकर, मनसेच्या नयना पल्लर यांच्यात लढत होणार आहे.
च्प्रभाग ७० सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात ५१ हजार ४८८ लोकसंख्या आहे.शिवसेनेच्या वीणा टाँक, भाजपाच्या सुनीता मेहता, काँग्रेसच्या बिनिता वोरा, मनसेच्या रश्मी येलंगे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्मिता परेरा यांच्यात लढत होणार आहे.
च्प्रभाग ७१ सर्वसाधारण पुरुषांसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात एकूण ५७ हजार ५८५ लोकसंख्या आहे. एकूण १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून शिवसेनेचे जितेंद्र जनावळे, भाजपाचे अनिल मकवानी, काँग्रेसचे जयंती सिरोया या तीन उमेदवारांमध्ये प्रमुख लढत आहे.