सेना-भाजपाने गरीबांचा घास हिसकावला
By Admin | Updated: April 19, 2015 00:18 IST2015-04-19T00:18:13+5:302015-04-19T00:18:13+5:30
२ रुपये किलो दराने गहू, तांदूळ उपलब्ध करून दिले होते.परंतु सत्तेवर येताच शिवसेना - भाजपा सरकारने रेशनवरील धान्य बंद करून गरीबांच्या तोंडातील घास हिसकावला.

सेना-भाजपाने गरीबांचा घास हिसकावला
नवी मुंबई : काँग्रेसने अन्नसुरक्षा कायदा करून गरीब जनतेला २ रुपये किलो दराने गहू, तांदूळ उपलब्ध करून दिले होते.परंतु सत्तेवर येताच शिवसेना - भाजपा सरकारने रेशनवरील धान्य बंद करून गरीबांच्या तोंडातील घास हिसकावला. भूमी अधिग्रहण कायद्यात बदल करून शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने हिसकावूून घेण्याचा डाव आखला असून अच्छे दिन आयेंगेच्या घोषणा देऊन भाजपाने भारतीयांची फसवणूक केल्याची टीका काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.
विष्णुदास भावे नाट्यगृहात काँगे्रसच्या जाहीरनामा प्रकाशनावेळी ते बोलत होते. केंद्रात भाजपाने सत्तेवर येताच अन्नसुरक्षा योजना बंद केली. गरीबाच्या घरातील पेटणारी चूल यांनी विझविली आहे. सामान्यांचा घास हिरावून घेणाऱ्यांना मतदान करणार का, असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला. भूमी अधिग्रहण कायद्यात बदल करून शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने ताब्यात घेण्याचे षड्यंत्र रचणाऱ्या शिवसेना व भाजपाला मतदान करू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँगे्रसवरही टीका केली. भाजपा व राष्ट्रवादी एकमेकांना मिळालेले असल्यासारखे वाटते. ते विरोधात आहेत की सत्तेत हेच कळत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी मंत्री रमेश बागवे, जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, कमलताई व्यवहारे, छायाताई आजगावकर, बाबू थॉमस, मुश्ताक अंतुले, रमाकांत म्हात्रे, संतोष शेट्टी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सर्वांगीण विकासाचा वचननामा
च्काँगे्रसने जाहीरनाम्यात शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन दिले आहे. शहरात झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविणे. रो-हाऊस व बैठ्या चाळींनाही वाढीव चटईक्षेत्र मिळवून देणे. विभागनिहाय सर्वसुविधा असणारे मार्केट, महत्त्वाच्या ठिकाणी बहुमजली वाहनतळ, मोबाइल रुग्णालय, नोकरीमध्ये नवी मुंबईतील रहिवाशांना प्राधान्य, महिला व वृद्धांसाठी योजनांचा जाहीरनाम्यात समावेश आहे.
च्महापुरुषांची स्मारके, मेट्रो, मोनो रेल्वे सुरू करणार. सौरउर्जेचा वापर, नागरिकांच्या सुविधेसाठी एक खिडकी योजना व खाडीकिनाऱ्यासह डोंगररांगांवर पर्यटनस्थळ विकसित करण्याचे आश्वासन दिले आहे.