सशस्त्र दरोडेखोरांना अटक
By Admin | Updated: December 11, 2014 02:04 IST2014-12-11T02:04:10+5:302014-12-11T02:04:10+5:30
एका अंगडिया व्यापा:याकडून सहा कोटींची रोकड लुटण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांच्या सात जणांच्या टोळीला ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने अटक केली आहे.

सशस्त्र दरोडेखोरांना अटक
ठाणो : एका अंगडिया व्यापा:याकडून सहा कोटींची रोकड लुटण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांच्या सात जणांच्या टोळीला ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल, सहा काडतुसे, चाकू, सुरे, लोखंडी हातोडे, बेसबॉल बॅट या शस्त्रंसह एक स्वीफ्ट कार आणि एक मोटारसायकल हस्तगत केली आहे.
झहीरखान बेलीम, (26, रा. पाटण, गुजरात), मारुमियाँ शेख (37, म्हैसाना, गुजरात), रतनसिंग वाघेला (26, वसई, जि. पालघर), इकबाल पठाण (43, म्हैसाना), जितेंद्र पाटील (34, रा. अंबरनाथ, ठाणो), दिग्विजय सिंग राणा (25, रा. पाटण, गुजरात) आणि नरेश नाई (29, रा. बनासकडा, गुजरात) अशी अटक केलेल्या सात जणांची नावे आहेत. अंगडिया तसेच सोनेचांदीच्या व्यापा:यांची करोडोंची रोकड लुटीसाठी ही टोळी येणार असल्याची ‘टीप’ युनिट एकचे हवालदार आनंदा भिलारे यांना मिळाली होती. त्यानुसार, उपायुक्त पराग मणोरे, सहायक पोलीस आयुक्त नागेश लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
निरीक्षक डोईफोडे यांच्यासह एपीआय अविराज कुराडे, o्रीशैल चिवडशेट्टी, उपनिरीक्षक अभिजित भुजबळ, मुरलीधर नाईकनवरे, दिगंबर शेडग आदींच्या पथकाने 9 डिसेंबर रोजी खारेगाव येथे ही कारवाई केली. कळवा पोलीस ठाण्यात दरोडय़ाच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना 15 डिसेंबर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)
गुजरात पोलीस झहीर खानच्या शोधात : या टोळीमधील झहीरखानविरुद्ध गुजरातच्या शिरपूर पोलीस ठाण्यात खुनाचे 2 आणि दरोडय़ाचा एक असे गुन्हे दाखल आहेत. यात तो ‘वॉण्टेड’ असून गुजरात पोलीस मागावर आहेत.