वाद मिटवतानाच सशस्त्र मारामारी

By Admin | Updated: December 22, 2014 22:33 IST2014-12-22T22:33:12+5:302014-12-22T22:33:12+5:30

रायगड जिल्ह्यात गावकी व जात पंचायतींच्या माध्यमातून घेण्यात येणारे वाळीत टाकण्याचे निर्णय आणि बेकायदा न्यायनिवाडे याबाबत जिल्ह्यात जिल्हा प्रशासन

Armed fights while dissolving the dispute | वाद मिटवतानाच सशस्त्र मारामारी

वाद मिटवतानाच सशस्त्र मारामारी

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गावकी व जात पंचायतींच्या माध्यमातून घेण्यात येणारे वाळीत टाकण्याचे निर्णय आणि बेकायदा न्यायनिवाडे याबाबत जिल्ह्यात जिल्हा प्रशासन, पत्रकार संघटना, स्वयंसेवी संस्था गावांगावातील वाद संवादातून मिटकण्याकरिता पुढाकार घेत आहेत. ग्रामीण भागात मात्र अद्यापही सामोपचारातून वाद मिटविला जात नाही. असाच प्रकार माणगावात झाला. वाद मिटवितानाच सशस्त्र मारामारी झाली.
माणगाव तालुक्यातील नाईटणे व ताम्हाणे गावातील एका विवाहीत दाम्पत्यांतील वाद मिटवण्याकरिता कुणबी समाजाने रविवारी माणगावच्या कुणबी समाज हॉलमध्ये आयोजित बैठकीतच दोन गटांत वादावादी होवून सशस्त्र मारामारी झाली. यात पाच ग्रामस्थ गंभीर जखमी होवून त्यांना माणगांवच्या उप जिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
घटनेचे गांभीर्य विचारात घेवून माणगांव पोलीसांनी या मारामारी प्रकरणी उभय गटांच्या अकरा जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. यात ज्ञानेश्वर पवार (रा.ताम्हाणे-पळसगाव), अजय पारपते (रा.वावे), परशुराम पारपते (रा.हातकेळी) व प्रमोद ढवळे (रा.नाईटणे) यांना अटक करण्यात आली आहे, मात्र समाज मंडळाचे मुंबईतून आलेले सदस्य मात्र फरार झाल्याची माहिती माणगांव पोलीसांनी दिली आहे.

Web Title: Armed fights while dissolving the dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.