क्षेत्रफळाच्या दुप्पट बिबटे

By Admin | Updated: July 25, 2014 14:21 IST2014-07-25T01:03:44+5:302014-07-25T14:21:30+5:30

बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने येथील बिबटय़ांची संख्या दुप्पट असल्याची धक्कादायक माहिती हाती लागली आहे.

Area duplicate | क्षेत्रफळाच्या दुप्पट बिबटे

क्षेत्रफळाच्या दुप्पट बिबटे

मनीषा म्हात्रे-मुंबई
बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने येथील बिबटय़ांची संख्या दुप्पट असल्याची धक्कादायक माहिती हाती लागली आहे. उद्यानाचे क्षेत्रफळ 103 चौरस किलोमीटर असून, उद्यानातील बिबटय़ांची संख्या 28 च्या जवळपास आहे. आणि प्रत्येक बिबटय़ाला वास्तव्य करण्यासाठी 5 ते 10 किलोमीटरचा परिसर लागत असल्याने बिबटय़ांची संख्या दुप्पट असल्याचे निदर्शनास आले आहे.
उद्यानालगत सुमारे 56 पाडे असून अंधेरी, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, पवई, भांडुप, मुलुंडपासून ठाण्यार्पयतचा परिसर मनुष्यवस्तीने वेढलेला आहे. येथील स्थानिकांचा उद्यानातील जंगलात मोठय़ा प्रमाणात वावर असतो. त्यातच पाळीव प्राण्यांची शिकार करण्यासाठी बिबटय़ा घनदाट जंगल सोडून मनुष्यवस्तीत प्रवेश करतो. महत्त्वाचे म्हणजे रात्रीदरम्यान मनुष्य एकटा जंगलात गेल्याने भक्ष्य समजून बिबटय़ाकडून त्याची शिकार होते. दरम्यान, बिबटय़ा मनुष्यवस्तीमध्ये शिरकाव करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असल्या तरी उद्यानात एकूण 28 बिबटे असून, त्यापैकी चार जेरबंद करण्यात आले आहेत. मात्र त्यांना केवळ जेरबंद करून ठेवता कामा नये. तर त्यांचे पुनर्वसन होणो गरजेचे आहे, असे प्राणिमित्र संघटनेचे म्हणणो आहे. तर दुसरीकडे बिबटय़ांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांना पर्यायी तुंगारेश्वर उद्यानात स्थलांतरित करण्यात येत असल्याचे वनविभागाचे म्हणणो आहे.
बिबटय़ाला राहण्यासाठी 5 ते 10 किलोमीटर परिसर लागतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे 1क्3 चौरस किलोमीटरवर पसरले आहे. त्यानुसार उद्यानात 12 ते 15 बिबटे राहू शकतात, असे प्राणिमित्र संघटनांचे म्हणणो आहे. उद्यानातील 
जंगलात लावलेल्या कॅमे:यांच्या आधारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 2012 मध्ये 22  बिबटे टिपण्यात आले होते. 
 
मनुष्याने उद्यानावर अतिक्रमण केल्याने बिबटय़ाचे हल्ले वाढत आहेत. मात्र यावर उपाय म्हणून त्यांना जेरबंद करणे योग्य नाही. उलटपक्षी स्थानिकांनीच याबाबत खबरदारी बाळगली पाहिजे. - पवन शर्मा (अध्यक्ष, रेस्क्युइंग असोसिएशन फॉर वाइल्ड लाइफ वेल्फेअर)
 
मनुष्यवस्तीमधील पाळीव प्राण्यांच्या शिकारीसाठी बिबटय़ाचा वावर वाढतो आहे.  - सुधीर पडवळे (मुख्य वन अधिकारी)
 
2012 साली घडलेल्या घटना
 
17 नोव्हेंबर : भांडुप-तानाजीवाडी, चाफ्याचापाडा परिसरात  राहणा:या उषा विनय यादव या अडीच वर्षाच्या मुलीचा बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
5 नोव्हेंबर : भांडुप खिंडीपाडा परिसरातील जंगलात सुमारे दीड किलोमीटर आत इसमाचा मृतदेह सापडला. मृतदेह बिबटय़ाने खाल्लेल्या अवस्थेत होता.
2 नोव्हेंबर : पवई मरोशीपाडा परिसरात रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शौचास गेलेल्या सीताबाई पागे (55) या महिलेचा बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्यू.
16 जुलै : मुलुंड कॉलनी, हनुमान पाडा परिसरातील जंगलात आईसोबत शौचास गेलेल्या संजना थोरात (7) या मुलीचा बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्यू.
 
 
2014 साली घडलेल्या घटना
मार्चमध्ये गोरेगाव म्हाडा कॉलनीमध्ये बिबटय़ाचा शिरकाव
2 जुलै : मुलुंड कॉलनी परिसरात 
कु त्र्याच्या भीतीने बिबटय़ाने पळ काढला
 
2013साली घडलेल्या घटना
23 नोव्हेंबर : आरे कॉलनी, आदर्श नगर येथे बिबटय़ाच्या हल्ल्यात सौरभ यादव या तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू.
18 ऑक्टोबर : प्रशांत साळुंखे या 11 वर्षीय मुलाचा मृत्यू.
 

 

Web Title: Area duplicate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.