मुंबई : अनेकवेळा महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील वीज ग्राहक धनादेशाद्वारे वीजबिल भरतात. कधी-कधी त्यांनी दिलेला धनादेश अनादरीत (चेक बाउन्स) होतो. कारण, अनेकवेळा ग्राहक दिलेल्या धनादेशावर चुकीची तारीख, चुकीची स्वाक्षरी, खाडाखोड, चुकीचे नाव टाकतात किंवा त्यांनी दिलेल्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याकारणाने धनादेश अनादरीत होतो. म्हणून, महावितरणने धनादेश अनादर झालेल्या वीज ग्राहकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
महावितरणकडून थकीत वीजबिल वसुलीची मोहीम सुरू असून, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. काही ग्राहक कारवाई टाळण्यासाठी न वटणारे धनादेश देऊन दिशाभूल करत आहेत. अशा ग्राहकांवर कारवाई करणार असल्याचा इशारा महावितरणने दिला आहे.
आपण वापरलेल्या विजेचे पैसे देण्याची जबाबदारी आपली आहे. कारवाई सामोरे जावे लागू नये, म्हणून प्रामाणिकपणे बिलाचा भरणा करावा. विविध डिजिटल पेमेंट सुविधांचा वापर करून ग्राहकांनी वीज बिल भरले, तर त्यांना विशिष्ट रक्कम सूट प्राप्त होते.संजय पाटील, मुख्य अभियंता, भांडुप परिमंडळ, महावितरण
प्रत्येक बिलासाठी स्वतंत्र दंड
अनादरीत झालेल्या एकाच धनादेशाद्वारे अनेक वीज बिलांचा भरणा केला असल्यास प्रत्येक वीज बिलासाठी स्वतंत्र दंडात्मक रक्कम लावण्यात येते. यासोबतच धनादेशाद्वारे वीजबिल भरण्याची सोय प्रतिबंधित करण्याची कारवाई करण्यात येते.
वाशी मंडळातील चार ग्राहकांविरुद्ध तक्रार
वाशी मंडळातील ४ ग्राहकांची पोलिसांत ऑनलाइन तक्रार नोंदविण्यात आली आहे. ठाणे मंडळाच्या तीन ग्राहकांवर ऑनलाइन तक्रार नोंदविण्यात आली आहे.
८८५ रुपयांचा भूर्दंड
चेक बाउंस झाल्यास वीज ग्राहकांना प्रत्येक वीज बिलासाठी विलंब आकार अधिक जीएसटी करासह ८८५ रुपयांचा दंड संबंधित ग्राहकांच्या पुढील महिन्याच्या वीज बिलामध्ये इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येतो.
Web Summary : MSEDCL warns electricity consumers against issuing non-encashable checks to avoid action. Dishonored checks will incur penalties, including a fine of ₹885 per bill and potential restrictions on check payments. Action has already been initiated against defaulting consumers in Vashi and Thane.
Web Summary : एमएसईडीसीएल ने बिजली उपभोक्ताओं को कार्रवाई से बचने के लिए गैर-भुगतान योग्य चेक जारी करने के खिलाफ चेतावनी दी है। अनादरित चेक पर ₹885 प्रति बिल का जुर्माना और चेक भुगतान पर संभावित प्रतिबंध सहित दंड लगेगा। वाशी और ठाणे में डिफ़ॉल्ट उपभोक्ताओं के खिलाफ कार्रवाई शुरू कर दी गई है।