भिवंडी पालिकेत आर्किटेक्टराज
By Admin | Updated: November 14, 2014 23:12 IST2014-11-14T23:12:15+5:302014-11-14T23:12:15+5:30
शहरातील प्रॅक्टीसिंग आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनीअर्स असोसिएशन ऑफ भिवंडी यांनी कोणताही गाजावाजा न करता गुपचूपपणो छोटासा कार्यक्रम राबविला.

भिवंडी पालिकेत आर्किटेक्टराज
भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेने 15क् वर्षात पदार्पण केल्याने महापालिकेने कोणताही कार्यक्रम न राबविल्यामुळे शहरातील प्रॅक्टीसिंग आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनीअर्स असोसिएशन ऑफ भिवंडी यांनी कोणताही गाजावाजा न करता गुपचूपपणो छोटासा कार्यक्रम राबविला. हा कार्यक्रम राबविताना या संस्थेने पालिकेच्या प्रवेश दालनाचे विद्रुपीकरण केले असून त्याकडे पालिका प्रशासन सराईतपणो दुर्लक्ष करीत आहे.
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेकडे सध्या पैशांची चणचण असल्याने नगर पालिकेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने कार्यक्रम घेणो जड जाणार आहे. तसेच स्थायी समितीने अर्थसंकल्पात या महोत्सवासाठी तरतूदही केली नाही. त्यामुळे पालिकेच्या ऑडिट विभागासदेखील अडचण निर्माण झाली आहे.
या सर्व वस्तुस्थितीचा फायदा घेत आपली मक्तेदारी निर्माण करण्याच्या हेतूने प्रॅक्टीसिंग आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनीअर्स असोसिएशनने विधानसभा निवडणूक संपल्यानंतर पालिकेच्या प्रवेश दालनात छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानिमित्ताने दालनात असलेल्या मान्यवरांच्या प्रतिमेशेजारी आपले फलक लावून दालनाचे विद्रुपीकरण केले आहे. त्यामुळे पालिकेत अर्किटेक्टराज असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. (प्रतिनिधी)
शहरात दरवर्षी अनधिकृत बांधकामांचा आकडा वाढत असताना या संस्थेचा बोर्ड पालिकेने मिरविणो तसेच विद्रुपीकरणाकडे डोळेझाक करणो म्हणजे विद्रुपीकरणास प्रोत्साहन देण्यासारखे होईल, अशी प्रतिक्रिया जनमानसातून उमटत असून मान्यवरांशेजारील हे फलक आयुक्तांनी त्वरित हटवावेत, अशी मागणी केली जात आहे.