मुंबई विमानतळाचे टर्मिनल १ खुले करण्यास मान्यता; २० ऑक्टोबरपासून वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 04:35 PM2021-10-04T16:35:27+5:302021-10-04T16:35:36+5:30

दररोज झेपावणार १५६ विमाने टर्मिनल १ खुले होणार होणार असल्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन आणि सोशल डिस्टन्सिंगची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास मदत होईल.

Approval to open Terminal 1 of Mumbai Airport; Transportation from 20th October | मुंबई विमानतळाचे टर्मिनल १ खुले करण्यास मान्यता; २० ऑक्टोबरपासून वाहतूक

मुंबई विमानतळाचे टर्मिनल १ खुले करण्यास मान्यता; २० ऑक्टोबरपासून वाहतूक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - मुंबई विमानतळाचे टर्मिनल १ वाहतुकीस खुले करण्यास अखेर मान्यता मिळाली आहे. त्यामुळे २० ऑक्टोबरपासून येथून नियमित विमान प्रचलन सुरू केले जाईल. 

गेल्या काही महिन्यांपासून वाढत असलेली प्रवासी संख्या हाताळण्यासाठी टर्मिनल १ खुले करण्याची मागणी पुढे आली होती. मुंबई विमानतळ प्रशासनाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि संबंधित यंत्रणांना त्याबाबत पत्र लिहिले होते. या यंत्रणांची मान्यता मिळाल्यामुळे २० ऑक्टोबरपासून टर्मिनल १ खुले करण्याचा मार्ग मोकळा झाला. 

नव्या वेळापत्रकानुसार, टर्मिनल १ वरून १५६, तर टर्मिनल २ वरून दररोज ३९६ विमाने ये-जा करतील. पहिल्या टप्प्यात गो फर्स्ट, स्टार एअर, एअर एशिया आणि ट्रू जेटची उड्डाणे नियोजित करण्यात आली आहेत. दुसऱ्या टप्प्यात ३१ ऑक्टोबरपासून इंडिगोची निवडक विमाने टर्मिनल १ वरून उड्डाण घेतील. मात्र, त्यांची बहुतांश सेवा टी२ वरून सुरू राहील. गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी संबंधित विमान कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई विमानतळ प्रशासनातर्फे करण्यात आले.

मुंबई विमानतळाच्या टर्मिनल- १ वरून देशांतर्गत, तर टर्मिनल- २ वरून आंतराष्ट्रीय आणि काही देशांतर्गत विमानांचे उड्डाण होते. मे २०२० मध्ये हवाई प्रवासावरील निर्बंध शिथिल केल्यानंतर केवळ टर्मिनल- २ वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. मर्यादित फेऱ्या सुरू असल्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण येथूनच होत होते. फेब्रुवारी महिन्यापासून प्रवाशांची संख्या पूर्वपदावर येऊ लागल्याने तब्बल वर्षभरानंतर १० मार्च २०२१ रोजी टर्मिनल- १ खुले करण्यात आले. परंतु, दुसऱ्या लाटेचा प्रकोप वाढल्याने अवघ्या काही दिवसांत २१ एप्रिलपासून पुन्हा डोमॅस्टिक टर्मिनल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

फायदा काय होणार?

- टर्मिनल १ खुले होणार होणार असल्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन आणि सोशल डिस्टन्सिंगची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास मदत होईल.

- टर्मिनल १ वर १२ नोंदणी कक्ष आणि कोरोना चाचणीसाठी १२ काउंटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे चेक-इन आणि कोरोना चाचणीसाठी लांबलचक रांगांमध्ये उभे राहण्याच्या त्रासापासून प्रवाशांना मुक्ती मिळेल.

 

Web Title: Approval to open Terminal 1 of Mumbai Airport; Transportation from 20th October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई