मुंबई : धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे ‘सिंघम’ म्हणून ओळख असणाºया पोलीस उपायुक्त शिवदीप लाडे यांच्यावर आता छतीसगड राज्यातील विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गृह विभागाने छतीसगडमधील सुरुगुजा जिल्ह्यातील निवडणूक निरीक्षक अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे.लाडे दीड वर्षापासून मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकात उपायुक्त आहेत. त्यांनी डिसेंबरमध्ये गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात आणि फेबु्रवारीलाइम्फाळ येथे झालेल्या निवडणुकीत निरीक्षक अधिकारी म्हणून काम केले होते.
छत्त्तीसगडमधील निवडणुकीत ‘सिंघम’अधिकाऱ्याची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 06:02 IST