संभाजी व्हनाळकर यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:06 IST2021-07-29T04:06:38+5:302021-07-29T04:06:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कामगार आयुक्त आस्थापनेवरील सहा सहाय्यक कामगार आयुक्तांची कामगार उपायुक्त या पदावर तात्पुरती पदोन्नती करण्यात ...

Appointment of Sambhaji Vhanalkar | संभाजी व्हनाळकर यांची नियुक्ती

संभाजी व्हनाळकर यांची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कामगार आयुक्त आस्थापनेवरील सहा सहाय्यक कामगार आयुक्तांची कामगार उपायुक्त या पदावर तात्पुरती पदोन्नती करण्यात आली आहे. त्यानुसार, संभाजी व्हनाळकर यांच्याकडे मुंबई लोखंड व पोलाद बाजार कामगार मंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. तसेच, मुंबई शहराच्या कामगार उपायुक्त पदाची जबाबदारी निलांबरी भोसले यांच्याकडे देण्यात आली आहे, तर उपनगराच्या कामगार आयुक्त पदावर भ. मा. आंधळे यांची नियुक्ती झाली आहे.

कामगार विभागाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला असून, संबंधित अधिकाऱ्यांना आपापल्या पदावर तातडीने रूजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संभाजी व्हनाळकर हे सहाय्यक कामगार आयुक्त असताना त्यांच्याकडे अनेकदा कामगार उपायुक्त या वरिष्ठ पदाचा कार्यभारही सोपविण्यात आला होता. त्यांनी सहाय्यक कामगार आयुक्त या पदावर मुंबई, पालघर व पनवेल येथे काम केले आहे. मुंबईत किमान वेतन सल्लागार मंडळाचे सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

Web Title: Appointment of Sambhaji Vhanalkar