शिवसेना भवनासह सर्व मालमत्तेवर कोर्ट रिसिव्हर नेमा; सुप्रीम कोर्टात याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2023 05:22 IST2023-04-11T05:09:04+5:302023-04-11T05:22:04+5:30
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाणाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल लागेपर्यंत शिवसेना भवन

शिवसेना भवनासह सर्व मालमत्तेवर कोर्ट रिसिव्हर नेमा; सुप्रीम कोर्टात याचिका
नवी दिल्ली :
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाणाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल लागेपर्यंत शिवसेना भवन, पक्षाच्या शाखा, पक्षनिधी, बँकखाती, फ्रंटल आणि संलग्नित संघटनांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेवर कोर्ट रिसिव्हर नेमण्यात यावा किंवा स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका ॲड. आशिष गिरी यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.
आमचा संबंध नाही : केसरकर
शिवसेनेची सर्व प्रॉपर्टी उद्धव ठाकरे यांनाच मिळू दे; आम्हाला त्यात कोणताही रस नाही. याचिकेशी आमचा संबंध नाही, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पंढरपूर येथे दिली.