भाजप कामगार आघाडीच्या अध्यक्षपदी किरण साळुंखेंची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:09 IST2021-08-13T04:09:03+5:302021-08-13T04:09:03+5:30
मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या कांदिवली पूर्व विधानसभा कामगार आघाडीच्या अध्यक्षपदी किरण साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार अतुल ...

भाजप कामगार आघाडीच्या अध्यक्षपदी किरण साळुंखेंची नियुक्ती
मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या कांदिवली पूर्व विधानसभा कामगार आघाडीच्या अध्यक्षपदी किरण साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार अतुल भातखळकर यांच्या मार्गदर्शनाने ही निवड करण्यात आली. याबरोबरच भाजप महामंत्रीपदी हेमंत मकवाना आणि मनसेतून आलेले वाॅर्ड क्र. २९ चे उपशाखा अध्यक्ष बबन शिंदे यांची कामगार आघाडीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
कांदिवलीत मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरणाचे जाळे आहे. येथील बोनाझा, आकुर्ली, बालाजी, गुंडेजा यासह लहान-मोठे उद्योगधंदे आहेत. यामुळे भविष्यात येथील कामगारांवर होणारे अन्याय, कमी वेतन, भविष्य निर्वाह निधी ही सर्व सुविधा मिळण्याबरोबरच घरकामगार, वेठबिगारी कामगारसह सर्व क्षेत्रांतील कामगारांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आता कांदिवलीतील कामगारांचा लढा उभारण्याचा निर्धार नवनियुक्त कामगार आघाडीचे अध्यक्ष किरण साळुंखे यांनी केला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार वर्गातून अभिनंदन केले जात आहे.