ठाकूर,गावित यांचे अर्ज
By Admin | Updated: September 27, 2014 00:10 IST2014-09-27T00:10:02+5:302014-09-27T00:10:02+5:30
यावेळी हितेंद्र ठाकूर यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी उसळली होती. निघालेल्या रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
ठाकूर,गावित यांचे अर्ज
वसई : शुक्रवारी वसई विधानसभा मतदारसंघामध्ये बहुजन विकास आघाडीचे माजी आ. हितेंद्र ठाकूर, काँग्रेसचे मायकल फुर्ट्याडो, डावी लोकशाही आघाडीचे मनवेल तुस्कानो यांनी आपल्या समर्थकांसह वसई निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी हितेंद्र ठाकूर यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी उसळली होती. निघालेल्या रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर पालघर येथे राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
पाच वर्षाची गॅप घेतल्यानंतर माजी आ. हितेंद्र ठाकूर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी विद्यमान महापौर नारायण मानकर यांना तिकिट दिले होते. परंतु मानकर यांना पराभव पत्करावा लागला. यंदा मात्र हितेंद्र ठाकूर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दुसरीकडे काँग्रेस पक्षातर्फे मायकल फुर्ट्याडो यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज त्यांनी आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. डाव्या लोकशाही आघाडीने राज्य जनता दलाचे सचीव मनवेल तुस्कानो यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यानुसार आज मनवेल तुस्कानो यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उद्या सेना, भाजपा, राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. पालघर येथे राज्यमंत्री गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उद्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सेना, राष्ट्रवादी, व मनसेचे उमेदवार अर्ज दाखल करतील असा अंदाज आहे. एकंदरीत लढतीचे चित्र आता पुर्णपणे बदलले आहे.
यापूर्वी होणाऱ्या तीरंगी व चौरंगी लढती ऐवजी आता ६ ते ७ जण रिंगणात असण्याची शक्यता आहे. नालासोपाऱ्याचे आ. क्षितीज ठाकूर यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज विरार बोळींज येथील निवडणुक कार्यालयात दाखल केला.