Join us  

मंडपासाठी केवळ २६२० गणेशोत्सव मंडळांचे अर्ज, मुदत वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 3:20 AM

गणेशोत्सवाला अवघे दोन आठवडे उरले असताना अद्याप केवळ २ हजार ६२० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीच अर्ज केले आहेत.

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे दोन आठवडे उरले असताना अद्याप केवळ २ हजार ६२० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीच अर्ज केले आहेत. यापैकी एक हजार पाच मंडळांना मंडपासाठी परवानगी मिळाली आहे. अर्ज करण्याची मुदत २४ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आल्याने गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे.मुंबईत सुमारे १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. महापालिकेच्या विविध विभागांकडून परवानगी घेण्याची प्रक्रिया किचकट असल्याने पालिका प्रशासनाने आॅनलाइन अर्ज मागविले आहेत. आतापर्यंत केवळ १५ टक्केच मंडळांनी महापालिकेकडे अर्ज केला आहे. मंडपाची परवानगी घेण्यापूर्वी बहुतांशी मंडळांनी गणेशमूर्ती आणण्यास सुरुवात केली आहे.मंडपासाठी अर्ज करण्याची मुदत १९ आॅगस्ट रोजी संपुष्टात येत आहे़ ८० टक्के मंडळांनी अद्याप अर्ज केला नसल्याने मुदतवाढ देण्याची मागणी गणेशोत्सव समन्वय समितीने केली होती. ही मागणी मान्य करीत पालिका प्रशासनाने २४ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.येथे करा अर्जwww.mcgm.gov.in  या वेब पोर्टलवर मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये अर्ज करावा. पालिकेच्या पोर्टलवरील > आॅनलाइन सेवा > परिरक्षण > गणपती/ नवरात्रीच्या टॅबखालील Ganapati/Navratri Mandap Application  मध्ये नमूद विविध लिंकनुसार अर्ज सादर करावा.मंडळांचे एकूण अर्ज - 2620एकाच मंडळाचे डबल अर्ज - 422अर्जांची छाननी - 2198परवानगी - 1005विविध कारणांमुळे अर्ज रद्द - 189मंजुरीबाबत प्रक्रिया सुरू - 1004

टॅग्स :गणेशोत्सवमुंबई