Join us
Daily Top 2Weekly Top 5

गणेश गौरव स्पर्धेचे अर्ज २२ आॅगस्टपर्यंत स्वीकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 02:27 IST

महापालिकेच्या विद्यमाने १९८८पासून म्हणजे गत २९ वर्षांपासून श्री गणेश गौरव स्पर्धा आयोजित करण्यात येते.

मुंबई : महापालिकेच्या विद्यमाने १९८८पासून म्हणजे गत २९ वर्षांपासून श्री गणेश गौरव स्पर्धा आयोजित करण्यात येते. या वर्षीसाठी १८ आॅगस्टपर्यंत गणेशोत्सव मंडळांना प्रवेश अर्ज स्वीकारण्याची मुदत देण्यात आली होती.या स्पर्धेचे प्रवेश अर्ज महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. स्पर्धेकरिता पूर्ण भरलेले अर्ज आता २२ आॅगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत जनसंपर्कअधिकारी यांच्या कार्यालयातच सादर करावेत, असे आवाहन या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाºयासार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :गणेशोत्सव