मेट्रो तिकीटदराबाबत मत नोंदविण्याचे आवाहन
By Admin | Updated: April 26, 2015 01:59 IST2015-04-26T01:59:23+5:302015-04-26T01:59:23+5:30
मेट्रोचा प्रवास मुंबईकरांना परवडत नसल्याच्या कारणास्तव मेट्रोच्या दराबाबत आपले मत मांडण्याची संधी मुंबई मेट्रोच्या प्रवाशांना मिळणार आहे.

मेट्रो तिकीटदराबाबत मत नोंदविण्याचे आवाहन
मुंबई : मेट्रोचा प्रवास मुंबईकरांना परवडत नसल्याच्या कारणास्तव मेट्रोच्या दराबाबत आपले मत मांडण्याची संधी मुंबई मेट्रोच्या प्रवाशांना मिळणार आहे. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून तशी सूचना जारी करण्यात आली असून, यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो रेल्वेला प्रवाशांनी उदंड प्रतिसाद दिला. मात्र कंपनीने दरवाढीचा झटका दिल्यानंतर तत्कालीन आघाडी सरकारने न्यायालयात धाव घेतली. आता न्यायालयाच्या सूचनेनुसार मेट्रोच्या दरनिश्चितीसाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली आहे. परिणामी प्रवाशांना आपले लेखी मत पत्रासह े४ेुं्रेी३१ङ्मााू@ॅें्र’.ूङ्मे द्वारे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नोंदविता येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, केंद्राने दर निश्चितीबाबत ७ एप्रिल रोजी निवृत्त न्यायाधीश ई. पद्मनाभन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे. समितीमध्ये राज्याचे माजी मुख्य सचिव जयंत बांठिया व माजी विधी सचिव टी.के.विश्वनाथन यांचा समावेश असून, समितीने अधिकाधिक प्रवाशांनी आपले मत मांडावे, असे आवाहन केले आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर संचालित मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने राज्य सरकारने मान्यता दिलेल्या किलोमीटरनुसार ९-११-१३ या दरानेतिकीट आकारणे गरजेचे होते. परंतु कंपनीने १०-२०-३०-४० असे दर लादले. त्याला राज्य सरकारने आक्षेप घेतला. उच्च न्यायालयाने दर कायम ठेवल्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दरनिश्चिती समिती स्थापन करण्यात आली आहे.
या पत्यावर पाठवा पत्र...
सुुकाणू अधिकारी, दरनिश्चिती समिती, मुंबई मेट्रो वन
प्रायव्हेट लिमिटेड
जे.पी.रोड, चार बंगला, अंधेरी (प), मुंबई,४०००५३, किंवा े४ेुं्रेी३१ङ्मााू@ॅें्र’.ूङ्मे या द्वारे प्रवाशांनी आपले मत मांडावे.