गणेश मंडळांना जलजागृती करण्याचे आवाहन
By Admin | Updated: September 17, 2015 03:12 IST2015-09-17T03:12:21+5:302015-09-17T03:12:21+5:30
मुंबईवरील जलसंकट गडद होत असतानाच यावर नामी युक्ती म्हणून जलनियोजनासह पाणी बचतीसाठी मुंबई महापालिका प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाच गळ

गणेश मंडळांना जलजागृती करण्याचे आवाहन
- महापालिकेची गळ
मुंबई : मुंबईवरील जलसंकट गडद होत असतानाच यावर नामी युक्ती म्हणून जलनियोजनासह पाणी बचतीसाठी मुंबई महापालिका प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाच गळ घातली आहे. गणेशोत्सवादरम्यान लोकांमध्ये पाण्याबाबत अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी मंडळांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिकेने मंडळांना केले आहे.
सद्यस्थितीमध्ये मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू आहे. १ आॅक्टोबरपर्यंत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावांत एकूण १४ लाख दशलक्ष लिटर्स पाणीसाठा जमा झाला नाही तर पाणीकपातीच्या वेळेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकर आता जे पाणी वापरत आहेत; त्यात अधिकाधिक बचत करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. तसे आवाहनच गणेश मंडळांनी मुंबईकरांना करावे, असे मंडळांना सांगण्यात आल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.