तौक्ते चक्रीवादळादरम्यान बोटी अथवा मासेमारी जाळ्यांचे नुकसान झाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:06 AM2021-05-17T04:06:31+5:302021-05-17T04:06:31+5:30

मुंबई : तौक्ते चक्रीवादळादरम्यान समुद्रकिनाऱ्यावर कोणताही जलचर प्राणी (मासे, कासव इ.) वाहून आल्याचे दिसून आल्यास तसेच बोटींचे व मासेमारी ...

Appeal for contact in case of damage to boats or fishing nets during a hurricane | तौक्ते चक्रीवादळादरम्यान बोटी अथवा मासेमारी जाळ्यांचे नुकसान झाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

तौक्ते चक्रीवादळादरम्यान बोटी अथवा मासेमारी जाळ्यांचे नुकसान झाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

Next

मुंबई : तौक्ते चक्रीवादळादरम्यान समुद्रकिनाऱ्यावर कोणताही जलचर प्राणी (मासे, कासव इ.) वाहून आल्याचे दिसून आल्यास तसेच बोटींचे व मासेमारी जाळ्यांचे नुकसान झाल्यास मत्स्यव्यवसाय विभागाच्या संबंधित परवाना अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाने केले आहे. यासाठी सागरी किनाऱ्यावरील प्रत्येक जिल्ह्यातील विभागाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही विभागाने जाहीर केले आहेत.

मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे-

मुंबई शहर

वरळी / ससून गोदी : कु. पाटील (७९७२२६३९४), नवीन भाऊचा धक्का : श्री. बादावार (९४२२८७२८५६)

ठाणे / पालघर

ठाणे : श्री. पाटील (९९२३०५०९८३)

डहाणू : कु. भोय(८६००६२७९०८)

सातपाटी : श्री. बाविस्कर (८४४६३२५०४०)

वसई : श्री. कोरे (९८२३०४११८९)

एडवण : श्री. अलगिरी (९८२३२१२७२२)

रत्नागिरी

जयगड : सौ. कांबळे (८३६९०८५०४९)

मिरकरवाडा : श्री. पाथरे (९५९४७४८७३८) साखरीनाटे : श्री. महाडवाला (९४०५९१०५०३)

गुहाघर : श्री. देसाई (९४०५०८५६१५)

दाभोळ : सौ. साळवी (८२७५४३५७०३)

मुंबई उपनगर

माहुल तुर्भे : श्री. साबळे (८२०८९०६९०२)

वर्सोवा : श्री. बुंदेले (९८३३९११९०५)

मढ गोराई : श्री. जावळे (९८३३२६६२५१)

रायगड

उरण : श्री. दाभणे (७०२१५४२११२)

अलिबाग : श्री. अंबुलकर (८०८०९९२२०३)

मुरुड : श्री. वाळुंज (७७९८७१६७२७)

श्रीवर्धन : श्री. पाटील (९८८१४५२४३६)

सिंधुदुर्ग

देवगड : श्री. मालवणकर (९४२२२१६२२०)

वेंगुर्ला : श्री. जोशी (९४२१२३८९१३)

मालवण : श्री. भालेकर (९८२३५७९३८२)

याशिवाय मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छीमारांसाठी सूचनाही केल्या आहेत. मच्छीमार बांधवांनी आपल्या मासेमारी नौका आणि इतर साधने सुरक्षित ठेवावीत. नौकामालकांनी खलाशांची सुरक्षित ठिकाणी सोय करावी. जीवितहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यक साधनसामुग्री सोबत बाळगावी, असे आवाहनही मत्स्यव्यवसाय विभागाने केले आहे.

--------- --------- - --

Web Title: Appeal for contact in case of damage to boats or fishing nets during a hurricane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.