Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई ग्राहक पंचायतीचे  संस्थापक आप्पासाहेब  गोडबोले यांचे निधन

By मनोहर कुंभेजकर | Updated: October 21, 2022 17:47 IST

मुंबई ग्राहक पंचायतीचे  संस्थापक, शतकवीर आप्पासाहेब  गोडबोले वय (१०१) यांचे आज सकाळी पुणे येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.

मुंबईमुंबई ग्राहक पंचायतीचे  संस्थापक, शतकवीर आप्पासाहेब  गोडबोले वय (१०१) यांचे आज सकाळी पुणे येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, सुन, मुलगी, जावई डॉ हब्बु, आणि नातवंडे असा परिवार आहे.

ग्राहक पंचायतीच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा सहभाग होता. आयुष्याच्या अखेरपर्यंत आप्पासाहेब मुंबई ग्राहक पंचायतीशी खुप जवळून जोडले गेले होते. संस्थेच्या असंख्य कार्यकर्त्यांचे आप्पासाहेब हे स्फुर्तीस्थान होते. संस्थेने गेल्या ४७ वर्षांत केलेल्या गौरवास्पद वाटचालीबद्दल ते नेहेमीच कार्यकर्त्यांचे कौतुक करत आले.‌ भरभरुन आनंदी जीवन जगण्याचे आणि दुसऱ्यांनाही आनंद देण्याचे  आप्पासाहेब हे एक आदर्श प्रारुप होते.

आप्पासाहेबांच्या जाण्याने संस्थेतील असंख्य कार्यकर्ते त्यांच्या मार्गदर्शनाला आणि कौतुकाला मुकणार असले तरी त्यांनी रुजवलेली मुल्याधिष्टीत विचारसरणी सर्वांच्याच कायम लक्षात राहील.आप्पासाहेबांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मुंबई ग्राहक पंचायतीचा परीवार सहभागी आहे आहे अशी श्रद्धांजली मुंबई ग्राहक पंचायतचे कार्याध्यक्ष अँड.शिरीष देशपांडे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हंटले आहे.

टॅग्स :मुंबईमृत्यू