कुठेही, कधीही बिल भरा
By Admin | Updated: August 8, 2014 09:15 IST2014-08-08T02:36:31+5:302014-08-08T09:15:10+5:30
शाळेचे शुल्क, वीज, पाणी बिल एकाच यंत्रणोच्या माध्यमातून भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रिझव्र्ह बँकेने ‘कुठेही, कधीही’ बिल भरणा व्यवस्थेचा प्रस्ताव मांडला आहे.

कुठेही, कधीही बिल भरा
>मुंबई : शाळेचे शुल्क, वीज, पाणी बिल एकाच यंत्रणोच्या माध्यमातून भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रिझव्र्ह बँकेने ‘कुठेही, कधीही’ बिल भरणा व्यवस्थेचा प्रस्ताव मांडला आहे. देशाच्या 20 मोठय़ा शहरात प्रत्येकवर्षी 6,00,000 कोटी रुपयांहून अधिकच्या 3,080 कोटी बिलांचा भरणा केला जोता.
यात किरकोळ स्वरुपाच्या बिलाचा मोठा वाटा आहे. ग्राहकांना अनेक प्रकारचे बिल भरावयाचे असते. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने एकीकृत भारत बिल पेमेंट सिस्टम अर्थात बीबीपीएसचा प्रस्ताव सादर केला आहे. (प्रतिनिधी)