Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुसी जा रहे हो?... इंग्लंड दौऱ्यावर निघालेल्या विराटला निरोप देताना हळवी झाली अनुष्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 17:27 IST

विराट व अनुष्का मुंबई विमानतळावर एकत्र पाहायला मिळाले.

मुंबई- टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या वर्षी लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या आधीपासूनच विविध कार्यक्रमात व क्रिकेट सामन्यांना विरूष्काची एकत्र हजेरी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. दोघांनी अनेकदा टीकेचाही सामना केला. पण तरिही विरूष्काची क्रेझ चाहत्यांमध्ये कमालीची आहे.  नुकतेच विराट व अनुष्का मुंबई विमानतळावर एकत्र पाहायला मिळाले. विराट इंग्लंड दौऱ्यासाठी आज रवाना झाला. दिल्लीतील पत्रकार परिषदेनंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. विराट कोहली आज सकाळी दिल्लीला रवाना झाला तेव्हा अनुष्का शर्मा त्याला मुंबई विमानतळावर सोडायला आली होती. विराट-अनुष्काचे मुंबई विमानतळावरील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे दोघे एकमेकांसोबत अतिशय खूष असून एकमेकांचा साथ एन्जॉय करत असल्याचं विराट व अनुष्काच्या चेहऱ्यावरून दिसतं आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माचा एअरपोर्टवर फॅशनेबल लूक पाहायला मिळाला. गुलाबी रंगाचा ड्रेस व पांढऱ्या रंगाचे शूज घालून अनुष्का विराटसोबत होती. तर विराटने काळ्या रंगाचं टीशर्ट घातलं होतं. नेहमी प्रमाणेच सगळ्यांचा नजरा विरूष्कावर खिळल्या.  दरम्यान, अभिनेत्री अनुष्का शर्माचा संजू सिनेमात प्रेक्षकांना दिसेल.त्यानंतर झिरो सिनेमात ती झळकणार आहे. त्यानंतर वरूण धवनबरोबर सुई-धागा या सिनेमात अनुष्का झळकेल.  

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माविरूष्काविमानतळ