Join us

अनुजकुमार थापनच्या मृतदेहाचे विच्छेदन, मृतदेह ठेवला शवागरात  

By संतोष आंधळे | Updated: May 3, 2024 01:19 IST

शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल येण्यात काही दिवस लागणार असल्याचे रुग्णलायतून सांगण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह शवागरात ठेवण्यात आला आहे.  

मुंबई :  सिने अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने त्याचा मृतदेह शव विच्छेदनसाठी जे जे रुग्णालयात आणण्यात आला होता. गुरुवारी त्या आरोपीचे शवविच्छेदन प्रक्रिया विडिओ चित्रीकरण करून पार पडली. यामध्ये प्रथमदर्शनी अहवाल कळू शकला नसला तरी अधिक तपासासाठी मृदेहाचा व्हिसेरा जतन करून ठेवण्यात आला आहे.  शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल येण्यात काही दिवस लागणार असल्याचे रुग्णलायतून सांगण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह शवागरात ठेवण्यात आला आहे.  

सलमान याच्या घरावर गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांना शस्त्रे पुरविणाऱ्या गँगचा सदस्य अनुजकुमार थापन यांनी पोलीस आयुक्तालयातील लॉकअप मध्ये असलेल्या शौचालयात चादरीच्या साह्याने गळफास घेतला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनसाठी जे जे रुग्णालयात पाठविण्यात आला होता. हे प्रकरण न्याय वैद्यक असल्याने शवविच्छेदनाची सर्व प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात आले. शरीरावरील सर्व खुणांच्या नोंदी करून ठेवण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :सलमान खानमृत्यू