अन्सारी उपचारासाठी लंडनला

By Admin | Updated: December 28, 2014 01:13 IST2014-12-28T01:13:51+5:302014-12-28T01:13:51+5:30

ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी व बांधकाम व्यावसायिक विनोद अन्सारी याला यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी लंडनला जाण्यास उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे.

Ansari treated London for treatment | अन्सारी उपचारासाठी लंडनला

अन्सारी उपचारासाठी लंडनला

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी व बांधकाम व्यावसायिक विनोद अन्सारी याला यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी लंडनला जाण्यास उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे.
न्या. पी. व्ही. हरदास व न्या. जी. एस. गोडबोले यांनी ही परवानगी दिली. अन्सारीने पन्नास लाख रूपयांची अमानत रक्कम व तेवढ्याच रकमेचा जातमुचलका न्यायालयात जमा करावा. तसेच लंडनमध्ये उपचार होणाऱ्या रूग्णालयाचा पत्ता व तेथील टेलिफोन नंबर पोलिसांना द्यावा, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
चार वर्षांपूर्वी जे. डे यांची गोळ्या झाडून हत्या झाली. याप्रकरणी अन्सारीसह इतर आरोपींविरोधात खटला सुरू आहे. यकृताच्या आजारावरील उपचारासाठी न्यायालयाने २०१२ मध्ये अन्सारीला जामीन मंजूर केला. आता डॉक्टरांनी त्याला यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला आहे. यासाठी अन्सारीने सेंट जॉर्ज रूग्णालय व चेन्नई येथील एका रूग्णालयात प्रयत्न केले.
मात्र या रूग्णालयांमध्ये ही शस्त्रक्रिया शक्य नसल्याने डॉक्टरांनी त्याला लंडन येथील हॉस्पिटलमध्ये संबंधित शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Ansari treated London for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.