लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून महापालिकेतील बदल्या थांबवल्यानंतर आता सात महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटल्यानंतर नव्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, पालिका प्रशासनात पुन्हा नियमित बदल्यांच्या नावाखाली तोच बदली घोटाळा होत असल्याचा आरोप आ. मिहीर कोटेचा यांनी केला आहे.
नवीन बदल्यांची ही प्रक्रिया नियमित प्रशासकीय बदल्यांच्या स्वरूपात दाखवली जात असली, तरी यादीतील ५५ अधिकाऱ्यांना पूर्वीच्या ऑक्टोबर बदली यादीतीलच पदस्थापना दिली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या संदर्भातील यादी त्यांनी आयुक्त अश्विनी भिडे यांना देत हस्तक्षेप करून हा घोटाळा थांबविण्याची मागणी केली आहे.
पालिकेमधील बदली व पदोन्नतीत मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. या आधीही मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अमित सैनी अतिरिक्त महापालिका आयुक्त असताना उपअभियंते व सहायक अभियंत्यांसह १६१ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते.
तीन अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्याचे समजत असले, तरी ही फाइल अद्याप पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्तांकडे पोहोचलेली नाही. त्यामुळे वेळेत योग्य ती कार्यवाही करून आयुक्तांनी हा घोटाळा थांबवावा.
मिहीर कोटेचा, आमदार
‘ती’ प्रक्रिया आता नव्याने
मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्या सर्व बदल्या रद्द केल्या होत्या. या दरम्यान या ‘कॅश फॉर पोस्टिंग’ घोटाळ्यात पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विविध श्रेणीतील बदल्या आणि पदोन्नतीसाठी पाच लाख ते ४० लाख रुपये घेतल्याचे गंभीर आरोप झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर स्थगिती मिळालेल्या बदल्यांची स्थगिती प्रक्रिया आता नव्याने सुरू झाली आहे.
Web Summary : MLA Koteccha alleges a transfer scam in Mumbai Municipal Corporation. Fifty-five officials are allegedly being assigned positions from a previous, controversial list. He demands intervention from the commissioner to halt the alleged irregularities, reminiscent of a prior 'cash for posting' scandal.
Web Summary : विधायक कोटेचा का आरोप है कि मुंबई महानगरपालिका में तबादला घोटाला फिर से शुरू हो गया है। कथित तौर पर पचपन अधिकारियों को पिछली विवादास्पद सूची से पद सौंपे जा रहे हैं। उन्होंने आयुक्त से हस्तक्षेप करने और कथित अनियमितताओं को रोकने की मांग की।