सागरी सेतूवरून आणखी एक आत्महत्या
By Admin | Updated: August 31, 2014 03:24 IST2014-08-31T03:24:56+5:302014-08-31T03:24:56+5:30
वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास विकास झोरे या पालिकेच्या कारकूनाने आत्महत्या केली.

सागरी सेतूवरून आणखी एक आत्महत्या
मुंबई : वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास विकास झोरे या पालिकेच्या कारकूनाने आत्महत्या केली. गेल्या दोन दिवसात सागरी सेतूवरून आत्महत्येची ही दुसरी घटना आहे. गुरूवारी सकाळी चिंतन शहा नावाच्या तरुणाने येथून समुद्रात उडी मारली होती. वरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येआधी विकास आणि त्याच्या प}ीसोबत होता. दोघांमध्ये वाद घडल्यानंतर विकासने हे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांना आहे. विकास गेल्या काही दिवसांपासून तणावग्रस्त होता, अशीही माहिती पोलिसांना चौकशीत मिळाली आहे.