डीजीचे आणखी एक पद रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:29 IST2021-02-05T04:29:25+5:302021-02-05T04:29:25+5:30

* बिपिन बिहारी निवृत्त : नव्या नियुक्तीबद्दल उत्सुकता जमीर काझी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य पोलीस दलातील महासंचालक ...

Another post of DG is vacant | डीजीचे आणखी एक पद रिक्त

डीजीचे आणखी एक पद रिक्त

* बिपिन बिहारी निवृत्त : नव्या नियुक्तीबद्दल उत्सुकता

जमीर काझी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य पोलीस दलातील महासंचालक दर्जाचे आणखी एक पद रिक्त झाले आहे. पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे कार्यकारी संचालक बिपीन बिहारी ३१ जानेवारीला सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. आणखी काही दिवस हे पद रिक्तच ठेवले जाण्याची शक्यता गृह विभागातील सूत्रांनी वर्तवली.

राज्याभरात विविध ठिकाणी पोलीस स्टेशन, वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यालये आणि सेवा निवासस्थान बांधण्याची जबाबदारी ‘पोलीस हौसिंग’कडे असते. त्यासाठी या महामंडळाकडे वर्षाला हजार कोटीची तरतूद असते.

राज्याच्या पोलीस प्रमुखपदाचा अतिरिक्त कार्यभार महिन्याभरापासून हेमंत नगराळे यांच्याकडे आहे. तर सुरक्षा महामंडळाच्या कार्यकारी संचालक पदाचा कार्यभार डिसेंबरपासून संजय पांडेय यांच्याकडे आहे. या पदावरून अनुक्रमे सुबोध जयसवाल केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले तर डी. कनकरत्नम नोव्हेंबरमध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानंतर आता ‘पोलीस हौसिंग’ची रिकामी पदामध्ये भर पडली आहे.

* रिक्त पदे टप्याटप्याने भरण्याचे धोरण

राज्य सरकारने रिक्त पदे एकत्रित भरण्याऐवजी टप्याटप्याने भरण्याचे धोरण अंवलबिले आहे. बिहारी हे १ जून २०१८ पासून पोलीस गृहनिर्माण विभागाचे प्रमुख होते. ते निवृत्त झाल्याने काही दिवसांसाठी अप्पर महासंचालक प्रज्ञा सरवदे यांच्याकडे ठेवला जाण्याची शक्यता आहे. पोलीस महासंचालक पदाच्या पदोन्नतीसाठी १९८८ च्या आयपीएस तुकडीचे अप्पर महासंचालक डॉ. के. व्यंकटेशम, तर त्याच्यानंतर १९९९ च्या बॅचचे संदीप बिष्णोई, ठाण्याचे आयुक्त विवेक फणसाळकर, पोलीस वाहतूक महामार्गचे प्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचा क्रमांक आहे.

.................................

Web Title: Another post of DG is vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.