ट्रेनमधून पडून आणखी एकाचा मृत्यू
By Admin | Updated: December 4, 2015 01:01 IST2015-12-04T01:01:28+5:302015-12-04T01:01:28+5:30
रेल्वेतून पडून प्रवासी मृत्युमुखी पडण्याच्या घटना ताज्या असतानाच गुरुवारी सायंकाळी ५ वाजता दिवा-कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान चालत्या रेल्वेतून पडून एका तरुणाचा

ट्रेनमधून पडून आणखी एकाचा मृत्यू
डोंबिवली : रेल्वेतून पडून प्रवासी मृत्युमुखी पडण्याच्या घटना ताज्या असतानाच गुरुवारी सायंकाळी ५ वाजता दिवा-कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान चालत्या रेल्वेतून पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आशीष सेने (१६) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव असून तो मित्रासोबत कल्याणला येत होता. तो मुंबईतील पवई भागात राहणारा आहे. या घटनेविषयी अधिक माहिती नसल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
अन्य एका घटनेत शहाड रेल्वे स्थानकातून आंबिवलीच्या दिशेने जाण्यासाठी सागा द्राविड (३०) रेल्वे गाडी पकडत होता. ती सुरू होताच तो गाडी व फलाटामधील फटीत पडल्याने पाय गमाविण्याची त्याच्यावर वेळ आली. त्याला उपचारासाठी केडीएमसीच्या रुक्मिणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.