दारुकांड प्रकरणी आणखी एकाला अटक
By Admin | Updated: August 1, 2015 04:22 IST2015-08-01T04:22:01+5:302015-08-01T04:22:01+5:30
मालवणीत १०४ निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या विषारी दारुकांडासाठी जबाबदार असलेल्या आणखी एकाला मुंबई गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री बडोद्यातून अटक केली. सुभाष गिरी (५८) असे त्याचे नाव आहे.

दारुकांड प्रकरणी आणखी एकाला अटक
मुंबई : मालवणीत १०४ निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या विषारी दारुकांडासाठी जबाबदार असलेल्या आणखी एकाला मुंबई गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री बडोद्यातून अटक केली. सुभाष गिरी (५८) असे त्याचे नाव आहे. तो गुजरातमध्ये २००९ साली झालेल्या विषारी दारुकांडातही दोषी असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. अटक आरोपींची संख्या एकूण १३ झाली आहे.
गिरी हा सप्लायर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. २००९ साली गुजरातमध्ये घडलेल्या विषारी दारुकांडात जवळपास १३६ लोकांचा बळी गेला होता. त्यात गिरी हा मुख्य आरोपी होता. पोलिसांनी अटक केलेल्या मोहम्मद लतिफ खान उर्फ आतिक याच्याशी गिरीची सहा महिन्यांपूर्वी भेट झाली होती. जुलै २००९मध्ये गुजरातमध्ये त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर २०१२ साली त्याला न्यायालयाकडून जामीन मिळाला. जामिनावर बाहेर असणाऱ्या गिरीने पुन्हा मिथेनॉल पुरविण्याचा व्यवसाय सुरू केला. बडोद्यामध्येच त्याचे कुटुंब राहत असून २००९पूर्वीपासून हा व्यवसाय करत आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी..
ममता लक्ष्मण राठोड, किशोर पटेल, इग्नेस ग्रेसी ऊर्फ आंटी, राजू हनमंता पास्कर ऊर्फ लंगडा, मन्सूर खान ऊर्फ आतिक, डोनाल्ड पटेल, गौतम हरते, सालिमुद्दिन शेख, फ्रान्सिस डिमेलो, लिलाधर पटेल, प्रकाशभाई ऊर्फ लालजीभाई पटेल, गीता उर्फ सिमरन सय्यद